Ajit Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या पक्षातील नेत्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यानंतर काही दिवसांतच खुद्द अजित पवार (Ajit Pawar) भाजपबरोबर गेले. या घडामोडींनंतर भाजपवरच टीका केली जाऊ लागली. अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच सोबत का घेतलं असे सवाल विचारले जाऊ लागले. यावर आता भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उत्तर दिले आहे. तसेच अजित पवार यांना सोबत का घेतलं याचाही खुलासा केला आहे.
Maharashtra Politics: ‘आमच्या मंत्रीमंडळातही अजित पवारांनी हेच केलं, वडेट्टीवार यांची जळजळीत टीका
बावनकुळे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व सगळ्यांनीच मान्य केलं आहे. अजित पवार आमच्यासोबत आले तेव्हा त्यांनीही मोदींचं नेतृत्व मान्य केलं. तसं जाहीरही केलं. बाकी चौकशा, कारवाया ज्या आधी झाल्या त्या होत राहतील पण आज त्यांनी मोदीजींना समर्थन दिलं हे जास्त महत्वाचं आहे.
यानंतर बावनकुळे यांनी राज्यात मुख्यमंत्री पदाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही भाष्य केलं. ते म्हणाले, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. भाजपाच्या नेत्यांना वाटतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. आमच्या केंद्रीय समितीने जर सांगितलं की पुढेही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील तर आम्हाला काम करावं लागेल.
शिंदे सरकारच्या चड्डीची नाडी, दिल्लीकरांच्या हाती; राऊतांची पातळी घसरली
त्यावेळीही अजितदादांना असुरक्षित वाटत होतं
शरद पवारांवर ही वेळ आली आहे. यावर मला जास्त व्यक्त होता येणार नाही. मात्र शरद पवार यांची ही स्थिती का झाली, जयंत पाटील यांची ही स्थिती का झाली. आज त्यांना त्यांचा पक्ष शोधावा लागत आहे. असं कशामुळे झालं याचा विचार त्यांनी केला पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्याबाबतही काही वेगळं नाही आज त्यांनाही त्यांचा पक्ष शोधावा लागत आहे. अडीच वर्षांपूर्वी हेच सत्तेत होते तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र आमचाच असे म्हणत होते परंतु,आज मात्र त्यांच्यावर आत्मपरिक्षणाची वेळ आली आहे.