Cheaters of Sai devotees in police custody : जगविख्यात असलेले शिर्डी येथील साईबाबा मंदिरात (Saibaba Mandir) जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. दरदिवशी हजारो नाही तर लाखो साई भक्त (Sai devotee) शिर्डी येथे येत साईचरणी लीन होतात. मात्र, शिर्डीत साईबाबांचे झटपट दर्शन आणि आरतीचा पास देण्याच्या नावाखाली साईभक्तांची फसवणूक झाल्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. दरम्यान, आता झटपट दर्शनासह स्वस्तात रूम मिळवून देण्याच्या बहाण्याने साईभक्तांची फसवणूक करणाऱ्या २० ते २५ दलालांना शिर्डी पोलिसांनी (Shirdi Police) ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीत प्रवेश करताच हे दलाल दुचाकीवरून साईभक्तांच्या वाहनांचा पाठलाग करत आणि त्यांना विविध आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करायचे. भाविकांनी नकार दिल्यास अनेकदा या दलाल लोकांनी त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याच्या घटनाही अनेकदा घडल्या होत्या. शिर्डी पोलिसांकडून अनेकदा दलालांवर कारवाई करण्यात येते.
मात्र, या कारवाईत सातत्य नसल्याने काही दिवसामध्येच पुन्हा भाविकांना फसवुकीचे प्रकार सुरू होतात. गेल्या काही दिवसात फसवणुकीच्या घटनांत सातत्याने वाढ होत असल्यानं या घटनांना निर्बंध घालण्यासाठी शिर्डी पोलिसांनी आज मोठा कारवाई केली.
Pune : शरद पवारांसमोरच अजित पवारांची ‘दादागिरी’ : भर बैठकीत चंद्रकांत पाटलांना धरलं धारेवर
आज दुचाकीवरून साईभक्तांच्या वाहनांचा पाठलाग करणाऱ्या २० ते २५ दलालांना ताब्यात घेत शिर्डी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. दरम्यान, अशीच कारवाई पुढे देखील सुरूच राहणार असून भाविकांनी भूलथापांना बळी पडू नये, असं आवाहन शिर्डी पोलिसांनी केलं आहे.
आता शिर्डी पोलिसांनी भाविकांची दिशाभूल करून फसवणूक करणाऱ्या दलालांना चाप लावण्यासाठी एका अधिकाऱ्यासह पाच पोलीस कर्मचाऱ्यांचे विशेष पथक देखील तैनात केलं आहे.