Download App

Shivaji Maharaj Statue : मोदींचा माफीनामा; राहुल गांधींनी RSS चं नाव घेत सांगितली तीन कारणं

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम आरएसएसच्या व्यक्तील दिलं असल्याचा आरोप काँग्रसचे खासदार राहुल गांधी यांनी केलायं. ते सांगलीत बोलत होते.

Rahul Gandhi : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं (Chatrapati Shivaji Maharaj Statue) काम आरएसएसच्या व्यक्तीला दिलं असल्याचा आरोप काँग्रसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलायं. दरम्यान, मालवणमधील राजकोटमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. या घटनेवरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतलं जात आहे. सांगलीत स्व. पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते.

पूजा खेडकरला कोर्टाचा दिलासा, तुर्तास अटकेपासून संरक्षण; ‘या’ दिवशी पुढील सुनावणी

यावेळी राहुल गांधी म्हणाले, छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितलीयं. पंतप्रधान मोदींनी कोणत्या कारणास्तव माफी मागितलीयं. त्याची अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात. त्यातील पहिलं कारण म्हणजे, पुतळ्याच्या निर्मितीचं कंत्राट आरएसएसच्या व्यक्तीला दिलं गेलं, माझ्याकडून चूक झाली, मी हे कंत्राट आरएसएसच्या व्यक्तीला दिलं पाहिजे नव्हतं असं मोदी म्हणाले आहेत. पुतळा निर्मीतीमध्ये भ्रष्टाचार झाला हे दुसरं कारण आहे. ज्याला कंत्राट दिलं त्याने भष्टाचार केला आहे, महाराष्ट्राच्या लोकांची चोरी केली, असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केलायं.

हरियाणात भूकंप! पहिल्या यादीनंतर राजीनाम्यांचं सत्र; ‘या’ दिग्गजांची भाजपाला सोडचिठ्ठी

तसेच छत्रपती शिवरायांच्या आठवणीत तुम्ही पुतळा बनवत आहात, पुतळा बनवताना तुम्ही एवढंही लक्ष दिलं नाही की पुतळा चांगला उभा राहू शकतो, मी आज पतंगराव कदमांच्या पुतळ्याची गॅरंटी देतो की चाळीस वर्षानंतरही हा पुतळा इथे उभा असेल. चुकीच्या व्यक्तीला कंत्राट दिल्याने पुतळा कोसळला आहे, हा शिवरायांचा अपमान आहे, मोदींनी फक्त शिवरायांची नाही तर महाराष्ट्राच्या लोकांची माफी मागितली पाहिजे, चूक केली नसेल तर माफी मागायची वेळच येत नाही, अशी टोलेबाजी राहुल गांधी यांनी केलीयं.

वडगाव शेरीत भाजप-राष्ट्रवादीचा वाद टोकाला; पक्षाचा आदेशच अंतिम, पंकजा मुंडेंनी क्लिअर सांगितलं

महाराष्ट्र महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकरांचा आहे. महाराष्ट्राच्या लोकांच्या डीएनएमध्ये काँग्रेस असून महाराष्ट्र काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचंही राहुल गांधी म्हणाले आहेत. तसेच यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केलीयं. मणिपुरमध्ये दीड वर्षांपासून हिंसाचार सुरु आहे, भाजपने तिथे आग लावल्यामुळेच पंतप्रधान मोदी मणिपुरला अद्याप एकदाही गेलेले नाहीत, अशी टीका गांधी यांनी केलीयं.

follow us