८७ कोटींची निधी मंजूर होऊनही पाणी पुरवठा योजनेला विलंब; शेवगावमध्ये बेमुदत उपोषण

अहमदनगर : सुमारे ६० हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या शेवगाव शहरासाठी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतुन सुमारे ८७ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर करून जवळपास ४ महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र निविदा प्रक्रियेला विलंब होत आहे. त्यामुळे पाण्याच्या टंचाईची समस्या तीव्रतेने वाढत आहे. परिणामी, नागरिकांना गैरसोयीचा सामना सहन करावा लागत आहे. दरम्यान, निविदा प्रक्रियेला जाणीवपूर्वक विलंब करून […]

Untitled Design   2023 03 20T194101.087

Untitled Design 2023 03 20T194101.087

अहमदनगर : सुमारे ६० हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या शेवगाव शहरासाठी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतुन सुमारे ८७ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर करून जवळपास ४ महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र निविदा प्रक्रियेला विलंब होत आहे. त्यामुळे पाण्याच्या टंचाईची समस्या तीव्रतेने वाढत आहे. परिणामी, नागरिकांना गैरसोयीचा सामना सहन करावा लागत आहे. दरम्यान, निविदा प्रक्रियेला जाणीवपूर्वक विलंब करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत नगरपरिषदेकडून वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरु असल्याची नागरिकांची भावना आहे. याच्याच निषेधार्थ निषेधार्थ शिंदे गट (शिवसेना) चे युवासेना जिल्हा प्रमुख साईनाथ आधाट, तालुका प्रमुख आशुतोष डहाळे यांच्या नेतृत्वाखाली तालुका संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

शेवगाव शहरासाठी शासनाने ८७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र, मात्र निविदा प्रक्रियेला विलंब होत आहे. त्यामुळं नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत नगरपरिषद प्रशासनाकडून वेठीस धरले जात आहे. याबाबत संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेकडून बेमुदत उपोषण आंदोलन सुरु केलं. क्रांती चौकात आजपासुन हे बेमुदत उपोषण आंदोलन सुरु केलं आहे. याबाबत येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नितीन राउत यांच्यासह सर्व संबधितांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, शेवगाव शहराची लोकसंख्या ६० हजाराच्या आसपास जावून पोहचली आहे.

मात्र शहराला गेल्या काही दिवसापासून १० ते १५ दिवसातून एकदा व तोही अत्यल्प पाणी पुरवठा सुरु आहे. नागरिकाकडून भरमसाठ पाणी पट्टी, आकारली जात असून वर्षातून केवळ २५ ते ३० वेळा नागरिकांना मिळते. शहरापासून जायकवाडी जलाशय हाकेच्या अंतरावर असतांना आणि जलाशयात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असताना नागरिकांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी सदासर्वकाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे. नगरपरिषदेच्या योग्य नियोजनाअभावी शहरातील नागरिकांना पुरेसे पिण्याचे पाणी मिळत नाही. ही वस्तुस्थिती या प्रश्न लवकरात लवककर सोडवावा, अशी मागणी केली आहे.

कृषिमंत्र्यांच्या चुकीवर अनिल देशमुखांनी ठेवलं बोट; शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन आक्रमक 

याबाबत बोलतांना शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हा युवासेना प्रमुख साईनाथ आधाट यांनी सांगिलते की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा.डॉ.सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी शेवगावच्या स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेसाठी पुरेशा प्रमाणात निधी मंजूर केला. मात्र नगरपरिषदेकडून निविदा प्रक्रियेला विलंब होत आहे. दरम्यान, नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळं पाणी पुरवाठी योजनेचा कार्यारंभ आदेश तातडीने देवून पाणी योजनेच्या कामाला तातडीने सुरुवात करावी आणि शेवगावकरांना पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध होईल यांची तरतूद करावी, अशी मागणी केली.

Exit mobile version