कृषिमंत्र्यांच्या चुकीवर अनिल देशमुखांनी ठेवलं बोट; शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन आक्रमक

कृषिमंत्र्यांच्या चुकीवर अनिल देशमुखांनी ठेवलं बोट; शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन आक्रमक

मुंबई : अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या (Farmer)प्रश्नावरुन राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh)कृषी विभागावर अर्थात राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना सभागृहात खडेबोल सुनावले आहेत. शेतकऱ्यांच्या असुविधेवरुन, शेतातील नुकसानीच्या मुद्द्यावरुन आमदार देशमुख आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आमदार अनिल देशमुखांनी शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांचं नुकसानीचे फोटो पाठवण्यासाठी दिलेल्या मोबाईल नंबरवर कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचा मुद्दा आज सभागृहात आक्रमकपणे मांडला. शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून देण्यात आलेले मोबाईल नंबरवर कोणताही प्रतिसाद मिळत नाही, त्यावर पाठवलेले फोटो कोणी पाहातही नाही असा थेट आरोप आमदार अनिल देशमुखांनी यावेळी सभागृहात केला आहे. त्याचवेळी देशमुख म्हणाले की, यामध्ये काही चुकीचे मोबाईल नंबर दिले असतील तर ते कृषिमंत्र्यांनी ते दुसरे नंबर द्यावेत आणि शासनानं यामध्ये लक्ष घालावं अशीही मागणी यावेळी आमदार देशमुखांनी केली आहे.

राज्याला गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. या अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीवरुन शेतकऱ्यांविषयी संवेदना व्यक्त केल्या होत्या.

बायकोला पेन्शन मिळाल्याचा भलताच आनंद, नवऱ्याने थेट तिला…

त्यानंतर कृषिमंत्र्यांनी या नुकसानभरपाईची दखल घेतली. त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीनं पंचनामे करुन नुकसानभरपाईचे आदेश दिले होते. त्याचबरोबर कृषी विभागाकडून शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील नुकसानीचा फोटो काढून अपलोड केला तरीही त्याला पंचनामा असं मानलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.

त्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून देण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकांवर आपापल्या शेतातील नुकसानीचे फोटो पाठवले. त्यानंतर अद्यापही या मोबाईल क्रमांकावर पाठवलेल्या फोटोंना कोणी पाहिलंच संबंधित शेतकऱ्यांच्या निदर्शनास आलं आहे.

त्याचबरोबर या क्रमांकावर शेतकऱ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास त्याला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचं शेतकऱ्यांचं मत असल्याचं यावेळी विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांनी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube