Sharad Pawar : वय झाल्यामुळे राजकारणातून निवृत्ती घेऊन नव्या पिढीला संधी मिळावी अशी इच्छा अजित पवार यांनी बोलून दाखवली होती. त्याला आधी होकार नंतर नकार देत शरद पवार मागे फिरले होते. त्यानंतर मुलगी सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाची सूत्रे दिली जातील अशी चर्चा होती. परंतु, या सर्व चर्चांवर शरद पवार यांनी पूर्णविराम दिला. आपण निवृत्ती घेणार नाहीच. पक्षाची सूत्रे कुणाकडेही देणार नाही असे संकेत शरद पवारांनी दिले.
अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर यांनी सोमवारी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांच्याबरोबर फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी देखील अजितदादांची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी पुढील दिशा स्पष्ट केली. शरद पवार म्हणाले, काही मुलांनी एक बोर्ड हातात घेतला होता. त्यात माझा फोटो होता.
मोठी बातमी! अखेर राज्यपाल नियुक्त आमदारांचा तिढा सुटला; आजच शपथविधी, महायुतीकडून कुणाची वर्णी?
त्यात लिहीलं होतं की 84 वर्षांचा म्हातारा. तुम्ही काळजी करू नका. आपल्याल लांब जायचंय. 84 वर्षांचा होतो की 90 वर्षांचा. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मला मागील साठ वर्षात एक दिवसही तुम्ही सुट्टी दिली नाही. महाराष्ट्राचा चेहरा बदलवण्याची माझी जबाबदारी आहे.
यानंतर शरद पवार यांनी राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीत 31 जागा गमावल्यानंतर लाडकी बहीण आठवली. बारामतीकर हुशार आहेत. बारामतीकरांनी बहिणीला पाठिंबा दिला, असे शरद पवार यांनी सांगितले. यानंतर शरद पवार गटात प्रवेश केलेल्या संजीवराजे निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र आणि देशाला शरद पवारांशिवाय पर्याय नाही, असे संजीवराजे निंबाळकर यावेळी म्हणाले.
आमदार आशुतोष काळेंचा कोल्हे गटाला पुन्हा धक्का, महत्त्वाचा पदाधिकारी फोडला