Download App

“मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे राहाता”, अजितदादांचा रामराजेंना थेट इशारा

तुम्ही दीपक चव्हाण यांच्या प्रचाराला जा, मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे राहता असा इशार अजितदादांनी रामराजे निंबाळरांना दिला.

Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar : फलटण विधानसभा मतदारसंघात यंदा बरीच उलथापालथ झाली आहे. अजित पवारांनी यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतरही आमदार दीपक चव्हाण यांनी तुतारी हाती घेतली. आता दीपक चव्हाण शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून मैदानात आहेत. तर दुसरीकडे रामराजे नाईक निंबाळकरांचीही चलबिचल सुरू आहे. यातूनच अजित पवार अस्वस्थ झाले आहेत. त्यांची ही अस्वस्थता काल फलटण येथील सभेत दिसून आली. तुम्ही दीपक चव्हाण यांच्या प्रचाराला जा, मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे राहता असा इशार अजितदादांनी रामराजे निंबाळरांना दिला.

अरे, बाप नाही पण तुझा काकाच..जयंत पाटलांचं अजितदादांना जशास तसं उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारानिमित्त शनिवारी फलटण शहरात अजित पवार यांनी सभा घेतली. या सभेत अजितदादा काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते. या मतदारसंघातील राजकारण अजितदादांच्या जिव्हारी लागणारं ठरलं होतं. त्याच पद्धतीने अजित पवार यांनी भाषणातून आपला इरादा स्पष्ट केला.

साखर कारखाना काढल्यानंतर सात वर्षात सरकार मदत करून कारखान्याला कर्जमुक्त करतं. तुम्ही २५ ते ३० वर्षे कारखाना चालवत आहात. एक अख्खी पिढी या कारखान्यावर मोठी झाली. मग तुम्ही (रामराजे निंबाळकर) नेमकं करता तरी काय? तुमच्यात धमक आणि ताकद नाही का? तुम्ही तर श्रीमंत.. राजे.. आहात. तुम्ही उघडपणे त्या दीपक चव्हाणच्या प्रचाराला जाऊन दाखवा मग, मी पण बघतो तु्म्ही आमदार कसे राहाता.

तुम्ही आता तिकडे (शरद पवार गट) गेलेलेच आहात ना मग आमदारकीचा राजीनामा द्या. आमदारकीवर लाथ मारा आणि खुशाल जा. तुमच्यात खरंच धमक आणि ताकद असेल तर आमदारकीला लाथ मारा आणि तिकडे जा. मला त्याचं काहीच वाटणार नाही, असे आव्हान अजित पवार यांनी दिले.

स्वतःच्या गावात पोलीस स्टेशन बांधता येत नाही अन् निघाले.., अजित पवारांचा जयंत पाटलांवर हल्लाबोल

फलटणचं बारामती सोपं नाही

अजित पवार पुढे म्हणाले, फलटणचे नेते म्हणतात आम्हाला फलटणचा बारामती करायचा आहे. पण बारामती करणं एवढं सोपं नाही. ते श्रीमंतांना विचारावं लागेल. लोकसभा निवडणुकीच्या वेळी साताऱ्याच्या बदल्यात माढा लोकसभेची जागा भाजपकडे मागितली होती. अमितभाईंना भेटून मी सांगितलं होतं की सातारा सोडतो, तुम्ही मला माढा द्या. पण त्या ठिकाणी रणजित निंबाळकर आहेत असं अमितभाईंनी सांगितलं.

follow us