‘स्वतःच्या गावात पोलीस स्टेशन बांधता येत नाही अन् निघाले…’, अजित पवारांचा जयंत पाटलांवर हल्लाबोल
Ajit Pawar On Jayant Patil : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले (Nishikant Bhosale) यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलताना पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. या सभेत बोलताना अजित पवार यांनी जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासह महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांवर टीका केली.
अजित पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आम्ही कमी पडलो. कांदा उत्पादक शेतकरी कांदा नियातबंदी केल्यामुळे नाराज होता आणि त्याचा फटका आम्हाला लोकसभा निवडणुकीत बसला. मात्र आम्ही नियातबंदी चालू केली आहे. असं अजित पवार म्हणाले. तसेच केंद्र सरकार महाराष्ट्राला मदत करत आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक विकास कामे होत आहे.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, इतकं वर्ष तुमच्याकडे अर्थ खाते होते मात्र या मतदारसंघाचा विकास का झाला नाही? याचा मला आश्चर्य वाटते. असं म्हणत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका केली. तसेच जर लोकांचे प्रश्न सोडवायचे असेल तर धमक आणि ताकद लागते असं देखील अजित पवार म्हणाले.
लोक प्रतिनिधी म्हणून 25-30 वर्ष काम करत आहे मात्र मतदारसंघाचा काहीच विकास झालेला नाही. तुम्हाला तुमच्या भागातील लोकांना दिवाळी देखील साजरी करून देता येत नाही आणि तुम्ही मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहतात असा टोला या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटील यांना लावला.
PM Narendra Modi : काँग्रेस, संविधान अन् जम्मू काश्मीर नरेंद्र मोदींनी नांदेडमध्ये सभा गाजवली
नेतृत्व विकास करणारे लागतं. नुसतं काय सांगता. काय बोलता असं बोलून काय होत नाही. अरे काय सांगता काय सांगता.. मी जे सांगतो ते तुमच्या डोक्यात शिरत नाही. मग काय सांगू असं अजित पवार म्हणाले. तुम्हाला स्वतःच्या गावाचा पोलीस स्टेशन बांधता येत नाही आणि राज्याचं नेतृत्व करायला निघाले आहे. कशाला? संपूर्ण राज्यात भाड्याच्या जागेत पोलीस स्टेशन बांधायला? असं देखील अजित पवार म्हणाले. माझ्या हातात तिजोरी आली तेव्हा मी प्रत्येक महायुतीच्या आमदाराला भरपूर निधी दिला असेही अजित पवार म्हणाले.