PM Narendra Modi : काँग्रेस, संविधान अन् जम्मू काश्मीर; नरेंद्र मोदींनी नांदेडमध्ये सभा गाजवली
PM Narendra Modi : महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांसाठी प्रचार केला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या प्रचारार्थ नांदेडमध्ये (Nanded) जाहीर सभा घेतली. या सभेत मराठीमध्ये आपल्या भाषणाला सुरुवात करत त्यांनी काँग्रेस (Congress) आणि महाविकास आघाडी (MVA) सरकारवर जोरदार टीका केली.
नरेंद्र मोदी म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात भाजप (BJP) आणि महायुतीच्या समर्थानात एक लाट सुरु आहे. आज देश विकसित भारत या लक्षासह पुढे जात आहे. याबाबत लोकांना देखील माहिती आहे. त्यामुळे संपूर्ण देश भाजप आणि एनडीएची (NDA) सरकार निवडणून देत आहे. एनडीए सरकारला तिसऱ्यांदा जनतेने निवडणून दिलं मात्र यावेळी त्यामध्ये नांदेडमधून कमळ नव्हता. त्यामुळे यावेळी नांदेडमध्ये कमळला जिंकावा असा आवाहन नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली. तसेच महाराष्ट्राला विकसित करण्यासाठी महायुतीची सरकार पाहिजे असं देखील मोदी म्हणाले.
पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, मराठवाड्यामधील शेतकऱ्यांसाठी काँग्रेसने काहीच केलं नाही. मात्र महायुती सरकारने मराठवाड्याला दुष्काळापासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत असं मोदी म्हणाले. तसेच मराठवाड्यात सुरु असणाऱ्या योजनेला महाविकास आघाडी सरकारने ब्रेक लावला होता असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. गेल्या अडीच वर्षात मराठवाडयात 80 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात गुंतणवूक आली असं देखील मोदी म्हणाले.
तर काँग्रेसवर हल्लाबोल करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस नेते आता सर्वांना लाला रंगाची संविधानाची पुस्तक दाखवत आहे. मात्र पुस्तक उघडून पाहिलं तर कोरी आहे. पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाबाबत एकही शब्द नाही असा आरोप देखील या सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर लावला. कॉंग्रेसवाले देशात बाबासाहेबाचे नाही स्वतःच संविधान चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसची वेगळी पुस्तक संविधानाची खिल्ली उडवत आहे.
काँग्रेसने जम्मू काश्मीरमध्ये 370 लागू करून एक वेगळा संविधान लागू केला आणि तिरंगा ऐवजी दुसरा झेंडा फडकावला. काँग्रेसमुळे या देशात 75 वर्ष दोन संविधान लागू होते मात्र आम्ही 370 रद्द करून जम्मू काश्मीरमध्ये भारताचा संविधान लागू केला. आम्ही लाल चौकमध्ये तिरंगा फडकावला. असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“मविआ म्हणजे भ्रष्टाचार, वसुली अन् टोकन मनी..” PM मोदींनी व्याख्याच सांगितली
तर त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर ओबीसी, एसटी आणि एसीसीला विभाजन करण्याचा आरोप केला. काँग्रेस या जातींचा विभाजन करून आरक्षण रद्द करण्यची तयारी करत आहे. असा दावा देखील यावेळी मोदींनी केला. जेव्हा महाराष्ट्र विकसित होईल तेव्हाच भारत विकसित होईल. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात महायुती सरकार निवडणून द्या असा आवाहन या सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी केला.