शेवगाव नगर परिषदेच्या कचरा डेपोला आग !

अहमदनगर : शेवगाव तालुक्यात पुन्हा एकदा आगीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. शेवगाव नगर परिषदेच्या येथील गेवराई रस्त्यावर असलेल्या कचरा डेपोला मोठी आग लागली असल्याची घटना रविवारी घडली होती. सुदैवाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील गंगामाई कारखान्याला आग लागली असल्याची घटना घडली होती. यातच आता पुन्हा एकदा आगीची […]

Untitled Design   2023 03 20T153452.175

Untitled Design 2023 03 20T153452.175

अहमदनगर : शेवगाव तालुक्यात पुन्हा एकदा आगीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. शेवगाव नगर परिषदेच्या येथील गेवराई रस्त्यावर असलेल्या कचरा डेपोला मोठी आग लागली असल्याची घटना रविवारी घडली होती. सुदैवाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील गंगामाई कारखान्याला आग लागली असल्याची घटना घडली होती. यातच आता पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेवगाव नगर परिषदेचा गेवराई रोडवर कचरा डेपो आहे. येथील डेपोला रविवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास आग लागली असल्याची माहिती समोर आली. आगीची माहिती समजताच तातडीने घटनास्थळी परिसरातील भेंडा, वृद्धेश्वर, गंगामाई, कारखान्यासह पाथर्डी नगरपरिषदेच्या अग्नीशामक दलाच्या पथकाने हजेरी लावली.

सुमारे दोन तास भडकत असलेली ही आग आटोक्यात आणण्यात संबधित यंत्रणेस यश मिळाले. कचरा डेपो लगत आनंद निवास मुलींचे वसतीगृह आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी हानी झाली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह शेवगावकरांनी सुटकेचा श्वास सोडला.

त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतेल प्रभावी

दरम्यान रविवार हा सुट्टीचा दिवस असतानाही नगरपरीषदेचे मुख्याधिकारी संजय राउत व त्यांच्या सहका-यांनी तातडीने हालचाल केली. पोलीस निरीक्षक विलास पुजारी हे सदर घटनेची माहिती समजताच फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.

IND vs AUS : वनडेतील सर्वात मोठ्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने फलंदाजांना फटकारले

आगीची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत कार्य राबविले. त्यामुळे लागलेली ही आग आटोक्यात आणण्यात संबधित यंत्रणेला यश मिळाल्याने अनेकांनी वरील सर्वांच्या समय सूचकतेचे कौतुक केले आहे.

Exit mobile version