राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर आता अजित पवार गट व शरद पवार गट निर्माण झाला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन आमदारांमध्ये देखील आता दोन गट पडले आहेत. आता माजी आमदार अरुण जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या बैठकीत पक्ष वाढीसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली आहे.
शिंदे गटाचा विरोध धुडकावला, अजितदादाच अर्थमंत्री? सरकारी ‘जीआर’मध्ये भलतीच खेळी!
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना काही दिवसांपूर्वी राज्यात घडली आहे. शिवसेनेतील बंडानंतर आता राष्ट्रवादीमध्ये देखील बंडाची ठिणगी पडली. यानंतर आमदारांचा एक मोठा गट अजित पवारांसोबत गेला. अजित पवार यांनी राजभवन गाठत थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान यामध्ये अजित पवारांच्या गटात नगर जिल्ह्यातील काही आमदार आहे. यामध्ये प्रामुख्याने आमदार निलेश लंके, संग्राम जगताप यांचा समावेश आहे, दरम्यान अजित पवारांच्या या दरम्यानच्या काळात आमदार संग्राम जगताप हे त्यांच्या बाजूने अत्यंत भक्कम उभे होते.
Bharat Jadhav: “हे शहर आता…,” भरत जाधवने थेटच सांगितले मुंबई सोडण्यामागचं खरं कारण…
आमदार संग्राम जगताप यांनी अपेक्षेप्रमाणे अजित पवार यांच्या सोबतच जाणे पसंत केले. त्यातच शनिवारी आमदार संग्राम जगताप यांचे वडील माजी आमदार अरुण जगताप यांनी थेट मुंबई गाठत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यासाठी अरुण जगताप यांनी भेट घेतली.
‘72 Hoorain’ लवकरच बॉक्स ऑफिसवरुन गाशा गुंडाळणार? पहिल्याच दिवशी कमावले फक्त ‘इतके’ लाख
मोठी अपडेट : पालिका निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाहीच, आयोगाने दिले स्पष्टीकरण
संग्राम जगताप यांना 2019 ला राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचे खासदार सुजय विखे यांच्या विरोधात लोकसभेला मैदानात उतरवले होते. मात्र, त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला. मात्र त्यानंतर त्यांनी विधानसभा आरामात जिंकली. त्यांचे खासदार सुजय विखे यांच्या सोबत चांगले संबंध असून आता तर अजित पवार गट शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्तेत असल्याने आमदार जगताप यांना 2024 ची विधानसभा निवडणूक आणखीनच सोपी झाल्याची चर्चा आहे.