‘72 Hoorain’ लवकरच बॉक्स ऑफिसवरुन गाशा गुंडाळणार? पहिल्याच दिवशी कमावले फक्त ‘इतके’ लाख

‘72 Hoorain’ लवकरच बॉक्स ऑफिसवरुन गाशा गुंडाळणार? पहिल्याच दिवशी कमावले फक्त ‘इतके’ लाख

Box Office Collection: ‘७२ हूरें’ या सिनेमाचा (72 Hoorain) टीझर आल्यापासून तो वादात भवऱ्यात अडकला होता. सिनेमा अप्रूव्ह करून देखील सेन्सॉर बोर्डाने (censor board) या सिनेमाच्या ट्रेलरला फटकारलं होत. त्यानंतर निर्मात्यांनी नाराजी व्यक्त करत परवानगी नसताना देखील ट्रेलर डिजिटल स्वरुपात रिलीज केला. या संपूर्ण वादाच्या दरम्यान हा सिनेमा शुक्रवारी म्हणजेच ७ जुलै रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.

रिलीजच्या अगोदरच वादाच्या भवऱ्यात सापडलेला ‘७२ हुरें’ हा सिनेमा शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाला वादाचा फारसा फायदा झाला नाही. कारण पहिल्याच दिवशी सिनेमा बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) आदळल्याचे पाहायला मिळालं आहे. चित्रपटाला प्रेक्षकच मिळत नसल्याने पहिल्या दिवसाच्या कमाईत आकडे अत्यंत निराशाजनक आहे.

या सिनेमाच्या प्रदर्शनाविषयी निर्माते अशोक पंडित यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. धमक्या येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. परंतु सिनेमाबद्दल सांगायचं झाल्यास ‘७२ हुरें’ला प्रेक्षकच मिळत नाहीत. हा सिनेमा बघण्यासाठी शुक्रवारी थिएटर्समध्ये फक्त ७ टक्के प्रेक्षक दिसून आले आहेत. सिनेमाने पहिल्या दिवशी ५० लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. ही आकडेवारी खूपच कमी असल्याचे सांगितले जात आहे.

कथा महाराष्ट्राच्या राजकारणाची अन् षडयंत्र-कट-कारस्थानाची; शरद पवार येणार मोठ्या पडद्यावर

पहिल्या दिवसाची कमाई बघता हा सिनेमा सिनेमागृहांमध्ये जास्त दिवस टिकण्याची शक्यता कमी आहे. परंतु वीकेंडला ‘७२ हूरें’ ला प्रेक्षक मिळाल्यास कमाईच्या आकड्यात पहिल्या दिवसापेक्षा थोडी वाढ नक्कीच झाल्याचे दिसून आले आहे. हा सिनेमा सिनेमागृहांमध्ये टिकतो की आदळतो, हे लवकरच कळणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube