Download App

गणेश कारखाना निवडणुकीत विखेंना मोठा धक्का ! कोल्हे-थोरातांना आठ जागा

  • Written By: Last Updated:

Ganesh Sugar Factory Election : महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांना श्री गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत विखे गटाला केवळ एक जागा मिळाली आहे. तर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या गटाला मोठे यश मिळताना दिसत आहे. थोरात-कोल्हे गटाने आतापर्यंत आठ जागा जिंकल्या आहेत. तर नऊ जागांवर या गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे हा कारखाना विखेंच्या ताब्यातून थोरात-कोल्हे यांच्या ताब्यात जाईल, असा कल स्पष्ट झाला आहे. (ganesh-sugar-factory-election-kolhe-thorat-group-won-eight-seat)

ज्यांच्या जागा अधिक त्यांचा विरोधी पक्षनेता, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर अजित पवारांचा दावा

गणेश साखर कारखाना निवडणुकीत पहिल्यांदाच बाळासाहेब थोरात हे उतरले आहेत. त्यांनी भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा मुलगा विवेक कोल्हे यांच्याबरोबर पॅनेल तयार केला. विखेंना धक्का देण्यासाठी थोरात-कोल्हे गटाने जोरदार तयारी केली आहे. मतमोजणीत आतापर्यंत कोल्हे-थोरात गटांनी आठ जागांवर विजय मिळविला आहे. तर विखे गटाला केवळ एक जागा जिंकता आलेली आहे.

Shiv Sena@57 : बाळासाहेब ठाकरेंसोबत शिवसेना गाजवलेले फायर ब्रँड नेते….

शिर्डीपाठोपाठ राहाता गटात ही थोरात कोल्हे गटाने बाजी मारली आहे. या गटात कोल्हे-थोरात गटाचे कारखान्याचे माजी अध्यक्ष नारायणराव कार्ले हे विजयी झाले. त्यांना 3 हजार 906 मते मिळाली. याच गटाचे संपत कचरू हिंगे हेही विजयी झाले. त्यांना 3 हजार 688 मते मिळाली. गंगाधर पांडुरंग डांगे हे 3816 मते मिळवून विजयी झाले. तर विखे गटाचे पुंजाजी दगडू गमे यांना 3 हजार 273 मते मिळाली. उत्तम बळवंत डांगे यांना 3 हजार 137 मते मिळाली. अनिल सोपान सदाफळ यांना 3 हजार 247 मते मिळाली. शिर्डी सारखेच राहाता गटातही थोरात-कोल्हे गटाला सरासरी 700 मतांचे मताधिक्य मिळाले आहेत. त्यात आणखी तीन जागा थोरात-कोल्हे गटाने जिंकल्या आहेत.

लंकेंकडून विखे पाटलांचा एकेरी उल्लेख; म्हणाले, तुझ्या पोराला…

विखे गटाचे केवळ ज्ञानदेव चोळके हे विजयी झाले आहेत. गेल्या दहा वर्षांपासून गणेश कारखाना हा विखेंच्या ताब्यात असून, तो विखे कारखान्याने चालविण्यास घेतलेला आहे. परंतु आता सभासदांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार सुजय विखे यांना नाकारले आहे.

Tags

follow us