कायंदेंमुळे दानवेंची खुर्ची जाणार? अजितदादांच्या विधानाने ठाकरेंची धाकधूक वाढली

  • Written By: Published:
कायंदेंमुळे दानवेंची खुर्ची जाणार? अजितदादांच्या विधानाने ठाकरेंची धाकधूक वाढली

काल ठाकरे गटाच्या विधानपरिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील संख्याबळ कमी झाले आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे संख्याबळ वाढले. यावरच पत्रकारांनी अजित पवारांना विचारले की आता विधानपरिषदेत तुमचे संख्याबळ अधिक आहे मग तुमच्या पक्षाचा विरोधीपक्षनेता होणार का? यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले ज्यांच्या जागा अधिक त्यांचा विरोधी पक्षनेता असतो. यावर आम्ही विचार केला नव्हता पण बरं झालं तुम्ही मला सांगितले असे मिश्किल उत्तर यावेळी अजित पवारांनी दिले. (Ajit Pawar’s claim for the post of Leader of the Opposition in the Legislative Council, whose seat is more than his Leader of the Opposition)

पुढे बोलताना अजित पवार यांनी जाहिरातींवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोमणा लगावला. ते सांगतात की ते मला मुख्यमंत्री पदासाठी सर्वाधिक पसंती आहे. परंतु सर्व्हे तर त्यांना माझ्या पेक्षा देखील कमी पसंती आहे. याचा अर्थ तुम्ही मेडियावाले खोटं बोलताय असे यावेळी अजित पवार हसत म्हणाले.

संजय राऊत यांच्या महाविकास आघाडीत राहण्याच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले महाविकास आघाडीबाबातचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी घेतात. मी याबाबत उद्धव ठाकरे यांना विचारेन. तसेच संजय राऊत मला बिग नेता म्हंटले त्याबद्दल त्यांचे आभार मानले.

बाळासाहेब आंबेडकर औरंजेबाच्या कबरीवर गेले यावर बोलताना अजित पवार म्हणाले..औरंगजाबाबाद्दल महाराष्ट्रात काय मत आहे हे सगळ्यांना ठावूक आहे. मात्र कोणी कुठे जायचे हे ज्याने त्याने ठरवायचे आहे. आपण त्यांना काही सांगण्याचा संबंधच येत नाही.

Shiv Sena@57 : बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा धगधगता इतिहास…

20 जून 2022 रोजी शिंदेनी शिवसेना फोडत भाजप सोबत जाऊन महाविकास आघाडीसोबत गद्दारी केली. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस गद्दार दिवस पाळणार आहे. यावर बोलताना पवार म्हणाले गद्दार दिवस फार काही साजरा करण्यासारखा आहे असं मला वाटत नाही.

बी आर एस पक्ष प्रेवेशबाबत बोटाना अजित पवार म्हणतात महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र लढणार आणि भाजप आणि एकनाथ शिंदे एकत्र लढणार असं चित्र आहे. त्यामुळे अनेकांना आपल्याला उमेदवारी मिळणार नाही असं वाटतय त्यामुळे अनेकजण बी आर एस मधे जातायत. बी आर एस महाराष्ट्रात प्रयत्न करतायत. कोणत्याही पक्षाला आपल्या पक्षाची वाढ करण्याचा अधिकार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube