Ganesh Sugar Factory Election: महसूल व पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) व खासदार सुजय विखे यांनी गणेश कारखाना आपला ताब्यात राहण्यासाठी ताकद लावली होती. शेवटच्या टप्प्यात विखे पिता-पुत्रांनी भावनिक सादही मतदारांना घातली होती. खासदार सुजय विखे हे एका प्रचार सभेत थेट रडले होते ही. त्यानंतर मतदारांनी विखेंना नाकारले आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) व भाजपचे विवेक कोल्हे यांनी विखेंच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. थोरातांनी कोल्हेंच्या मदतीने मंत्री असलेल्या विखेंचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. विखे गटाला केवळ एका जागा जिंकता आली आहे. त्यामुळे विखे गटाचा या निवडणुकीत धुव्वा उडाला आहे.( Ganesh Sugar Factory Election kolhe thorat panel won)
शिंदेंनी नाही, उद्धव ठाकरेंनीच गद्दारी केली, देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी
हा कारखाना विखेंच्या मतदारसंघात आहे. त्यामुळे विखेंसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. हा कारखाना विखे यांच्या ताब्यात गेल्या आठ वर्षांपासून आहे. विखे कारखान्याने हा कारखाना चालविण्यासाठी घेतलेला आहे. विखे हे संगमनेरमध्ये जोरदार सक्रीय झालेले आहे. त्यात अनेक ग्रामपंचायतीवर विखेंच्या ताब्यात आलेल्या आहेत. त्यामुळे थोरात यांनीही या कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घातले.
ShivSena Anniversary : पीक कापून नेलं तरी शेती आमच्याकडेच, आम्ही निष्ठेचं पीक घेतो; ठाकरेंचे शिंदेंना टोले
माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या गणेश परिवर्तन पॅनलने १९ पैकी १८ जागांवर विजय मिळवत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या जनसेवा पॅनलचा दारुण पराभव केला. त्यांना होम ग्राउंडवर पराभवाचा जबर धक्का देत थोरात-कोल्हे गटाच्या गणेश परिवर्तन मंडळाने गणेश कारखान्यावर आपले वर्चस्व निर्माण केले आहे.
ही निवडणूक दोन्ही गटासाठी चुरशीशी व राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची झाली होती. त्यामुळे कारखान्याची निवडणूक कधी नव्हे एवढी गाजली व चर्चेची ठरली परिणामी राज्याचे राजकीय वर्तुळासह अनेकांचे या निवडणूक निकालाकडे लक्ष लागले होते. आज मतमोजणीत ब वर्ग मतदार संघाचा निकाल सर्वप्रथम घोषित झाला होत. या सोसायटी मतदारसंघातून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनलचे ज्ञानेश्वर चोळके हे विजयी झाले. थोरात-कोल्हे गटाच्या मंडळाचे उमेदवार सुरुवातीपासूनच मतमोजणीत आघाडी घेतली होती.
१९ जागांपैकी १८ जागांवर विजय मिळवत कोल्हे थोरात गटाने गणेश परिसरावरील आपलं वर्चस्व अधोरेखीत केले आहे. मतमोजणीनंतर निकाल जसजसे घोषित होत होते. तसा थोरात कोल्हे गटाच्या कार्यकर्त्ये गुलाबाचे मुक्त उधळण करून फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये जल्लोष करीत होते विजयानंतर विजयी उमेदवारांवर कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण केली. त्यानंतर बाळासाहेब थोरात, भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यासह विजयी उमेदवार विजयी सभा घेतली.