शिंदेंनी नाही, उद्धव ठाकरेंनीच गद्दारी केली, देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी
Devendra Fadnavis: मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कल्याण येथे भाजपने (Bjp) जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री शिंदे व इतरांना गद्दार म्हणणारे उद्धव ठाकरे यांनीच गद्दारी केली असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.( kalyan bjp programme devendra fadanvis on uddhav thackeray)
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही तुम्हाला काँग्रेस-राष्ट्रवादीकडे नाही ढकलले, तर तुम्ही खुर्चीच्या मोहासाठी विचारांशी गद्दारी केली. भाजपा आणि शिवसेना मिळून मते मागितली आणि खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलात. भाजपाच्या पाठित खंजीर खुपसणारे तुम्ही आहात. खरे गद्दार तर तुम्ही आहात, दुसर्यांना गद्दार म्हणण्याची तुमची लायकी नाही.
Uddhav Thackeray : भाजप दूध पाजतील, पुंगी वाजवतील नंतर टोपलीत घालून सोडून देतील
आज राज्यात दोन वर्धापनदिन चालले आहेत, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार वाचविले त्यांचा एक आणि दुसरा ज्यांनी बाळासाहेबांचे विचार बुडविले, त्यांचा चालू आहे. एक काळ असा होता की, संताजी-धनाजी यांची दहशत होती की मुगलांना जळीस्थळी तेच दिसायचे. आज मोदी आणि अमितभाईंचे नाव घेतले की, उद्धव, पवार आणि काँग्रेस तिघांनाही भीती वाटते. कालचे उद्धव ठाकरेंचे भाषण नव्हते, तर ती ओकारी होती, असे फडणवीस म्हणाले.
मोदींनी कोविडची लस तयारी केली मग संशोधक काय….उद्धव ठाकरेंची टोलेबाजी
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोक्यांचे वर्ष, गद्दारांचे वर्ष काय साजरे करता. तुम्ही तर अडीच वर्ष कुंभकर्णाच्या झोपेत होता. रोज जागतिक कुंभकर्ण दिन साजरा करीत होता.
दाऊदशी संबंधातून नवाब मलिकांना जेलमध्ये जावे लागले, तेव्हा त्याचा साधा निषेध करण्याची हिंमत नव्हती, त्यांना मंत्रिमंडळातून काढण्याची हिंमत दाखविली नाही.
अर्धवटराव, पूर्ण व्हिडिओ एेका
आजच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालच्या अकोल्यातील सभेच्या भाषणातील केवळ एक वाक्य ऐकवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्या भाषणातील 2 मिनिटांचा पूर्ण व्हीडिओ ट्विट करताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, अर्धवटराव, मी काय म्हणालो. ते पूर्ण तुम्ही ऐकलेच नाही. असो आता ऐका. याच अर्धवटपणामुळे तुम्हाला पानिपत शब्द अलिकडे अधिक आठवायला लागला. म्हणून म्हणतो, स्क्रिप्ट रायटर बदला!