Download App

राज्यपाल कोश्यारी राजीनाम्यावर खा. विखे म्हणाले, ‘कोश्यारींचा राजीनामा ही…’

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : काही दिवसांपूर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. अखेर आज कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्याकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन पायउतार होणार आहेत. भगतसिंग कोश्यारी यांच्या जागी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली. त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. संजय राऊत, सुप्रिया सुळे यांच्यांसह सर्व विरोधकांनी कोश्यारी यांच्यांवर टीका केली आहे. यावेळी संजय राऊत यांनी नवे राज्यपाल रमेश बैस यांना शुभेच्छा दिल्याच. पण इशाराही दिला आहे. बैस आहे की बायस आहेत हे माहीत नाही, असं सांगतानाच राज्यपालांनी घटनाबाह्य सरकारच्या शिफारशी मान्य करताना भान ठेवावं. नाही तर पुन्हा संघर्ष होईल, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. तर आता भाजप खासदार सुजय विखे राज्यपाल कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कोश्यारी यांचा राजीनामा ही नियमित प्रक्रिया असल्याचं त्यांनी सांगितलं.

राज्यपालांनी राजीनामा द्यायचा किंवा राजीनामा स्वीकारायचे विषय येत नाही, देशांमध्ये जवळपास सहा ते सात राज्यपालांची इतर ठिकाणी नियुक्त झाली आहे. तर काहींची बदली झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा कालावधी संपल्यामुळे नियमित प्रमाणे ही प्रक्रिया असल्याचे भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी म्हटले. पारनेर येथे वयोश्री योजनेच्या साहित्य वाटप कार्यक्रमात आले असता त्यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली.

खरंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चे राहिले. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील भूमिका असो वा महापुरुषांच्या बाबतीत केले भाष्य असो महाराष्ट्रात नेहमीच वातावरण तापलेले राहिले आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केल्यानंतर राज्यभरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती. दरम्यान, आज त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला.

Nana Patole : देशाची चौकीदारी करतो म्हणणारे ‘अडाणी’चे चौकीदार निघाले!

दरम्यान, वयोश्री योजनेच्या साहित्य वाटपाच्याकार्यक्रमात बोलतांना खा. विखे म्हणाले, राष्ट्रीय वयोश्री योजनेला 78 कोटी रुपयांचे बजेट होते. त्यापैकी 45 कोटींचे बजेट आम्ही अहमदनगर जिल्ह्यासाठी आणले. आतापर्यंत साहित्य वाटपाचे 45 कॅम्प आम्ही घेतले आणि जवळपास 55 ते 60 हजार नागरिकांना याचा लाभ मिळवून दिला असल्याचं त्यांनी सांगितलं.

मागच्या तीन वर्षांपासून ही योजना सुरू होती मात्र, या योजनेचा लाभ मिळवून देणारा मी देशात पहिला खासदार असल्याचे त्यांनी सांगितले. मी घेतलेला कॅम्प पाहून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात हा कॅम्प घेतला. आता ही योजना संपली आहे पण मी केलेल्या कामाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केल्याचे खासदार विखे म्हणाले.

 

 

 

 

 

Tags

follow us