Nana Patole : देशाची चौकीदारी करतो म्हणणारे ‘अडाणी’चे चौकीदार निघाले!

Nana Patole : देशाची चौकीदारी करतो म्हणणारे ‘अडाणी’चे चौकीदार निघाले!

पुणे : गेल्या नऊ वर्षांपासून मी देशाचा चौकीदार आहे असा दिंडोरा पिटणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) वास्तवात कोणाची चौकीदारी करतात. हे आता देशातील जनतेला कळू लागले आहे. याबाबत संसदेमध्ये एवढा गदारोळ होऊनही अडाणी प्रश्नावर पंतप्रधान मोदी यांची बोलती बंद झाली असून अशोभनीय पद्धतीने छाती बडवत आहे. खरंतर देशाचे चौकीदारी करतो म्हणणारे ‘अडाणी’चे चौकीदार निघाले, अशी घणाघाती टीका भाजप (BJP) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली.

कसबा पेठ मतदार संघ पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचार सभेत नाना पटोले यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी राज्याचे विराेधी पक्षनेता अजित पवार उपस्थित होते.

नाना पटोले म्हणाले की, स्वतंत्र्य पूर्व काळात देशात इंग्रजांची जुलमी राजवट उलथवून टाकण्यासाठी कसबा पेठेतील टिळक वाडा, महात्मा फुले वाडा येथे बैठका होऊनच इंग्रजांच्या विरोधात रान पेटवले. आज देशात तीच व्यवस्था पुन्हा आली आहे. उद्योगपतींची चौकीदारी करणारी हुकूमशाही व्यवस्था आपल्याला उखडून टाकायची आहे. त्याची सुरुवात आपल्याला या कसबा पेठ मतदार संघातून करायची आहे.

आपल्या दैवतांची, महापुरुषांची जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवा, हाकलून द्या, अशी आम्ही सातत्याने मागणी करत होतो. आंदोलन करत होतो. मात्र, भाजपने हाकलून दिले नाही. आज त्यांना सन्मानाने निरोप दिला आहे. हे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्या भाजपला इथला मतदार नक्कीच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. पण दोन महिन्यानंतर का होईना महाराष्ट्राला लागलेली कीड गेली. त्यावर आता जास्त काही बोलायला नको. कारण घाणीवर काय बोलायचे, अशी जहरी टीका करत नाना पटोले म्हणाले की, देशात महागाई, बेरोजगारी नवनवे विक्रम मोडत आहे. मात्र, आपल्या उद्योगपती अडाणीचे चौकीदार बनले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube