Satej Patil on Kolhapur violence : कोल्हापूरमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्यानं तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. काही संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली होती. त्याबंद दरम्यान काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. यामुळे पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. यावर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापूरमधील अशांतता होणं हे प्रशासनाला पुढाकार घेऊन टाळता येणं शक्य झालं असतं असे पाटील यांनी म्हटले आहे. (satej patil warning beenlistened to the violence in kolhapur would not have happened)
ते पुढं म्हणाले की काल एक स्टेटस लावण्यात आलं त्याचा मी निषेध करतो. पोलिसांना सांगून त्या युवकांवर कारवाई कारणं अभिप्रेत होतं, ती कारवाई झाली. त्यानंतर प्रशासनाने सर्व समाजातील नागरिकांना बोलवून शांततेचं आवाहन करण्याचा प्रयत्न केला होता.
तरी देखील हा उद्रेक झाला. आज कोल्हापूर बंदची हाक देण्यात आला आणि त्याला लोकांनी प्रतिसाद दिला. अपेक्षा एवढीच आहे की यातून सर्वसामान्य लोकांचे हाल होऊ नयेत असे सतेज पाटील म्हणाले. काल जी घटना घडली त्यावर पोलिस कडक कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. पोलिसांनी पुढाकार घेत दोन्ही-तिन्ही समाजाच्या लोकांनी एकत्र बोलवून त्यांना पोलिस कशी आणि किती कडक कारवाई करणार आहेत. याबद्दल विश्वास देणं अभिप्रेत होतं. ते झालेलं दिसत नाही, असे पाटील म्हणाले.
अबू आझमींनी आगीत तेल ओतलं! औरंगजेब तर म्हणे सेक्युलर…
शाहू महाराजांच्या भूमीत हे होतंय हे चुकीचं आहे असेही सतेज पाटील म्हणाले. ज्या तरुणाने हे आहे त्यावर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे याबद्दल कोणाचंही दुमत नाही. परंतु यानिमित्ताने कोल्हापूरमध्ये अशांतता होणं हे प्रशासनाला पुढाकार घेऊन टाळता येणं शक्य झालं असतं असेही सतेज पाटील म्हणाले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सतेज पाटील यांनी कोल्हापूरमध्ये दंगलीचे कारस्थान सुरु असल्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. सतेज पाटील म्हणाले होते की कोल्हापूरमध्ये अशांतता रहावी याचा प्रयत्न सातत्याने होत आहे, हे दिसून येत आहे. याचा फायदा कोणत्या राजकीय पक्षाला होत आहे हे दिसून येत आहे, असे पाटील यांनी म्हटले होते.
Kirit Somayya : मविआच्या काळात हिरवे झेंडे मिरवण्याची स्पर्धाच; लव्ह जिहादवरून सोमय्यांचा निशाणा
कोल्हापूर ही छत्रपत्ती शाहू महाराज यांची भूमी आहे. कोल्हापुरात येत्या दोन महिन्यांत दंगली घडवण्याचे कारस्थान सुरु आहे. ठराविक पक्षाला दंगली हव्या आहेत. मिरज दंगलीनंतर जास्त संख्येने आमदार निवडून आल्याने हाच कित्ता पुन्हा गिरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सतेज पाटलांनी केला होता.