Kirit Somayya : मविआच्या काळात हिरवे झेंडे मिरवण्याची स्पर्धाच; लव्ह जिहादवरून सोमय्यांचा निशाणा

Kirit Somayya : मविआच्या काळात हिरवे झेंडे मिरवण्याची स्पर्धाच; लव्ह जिहादवरून सोमय्यांचा निशाणा

Kirit Somayya : महाविकास आघाडीच्या काळात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हिरवे झेंडे घेऊन मिरवण्याची स्पर्धाच सुरू होती. त्याचाच परिणाम लव्ह जिहाद प्रकरणांची झपाट्याने वाढ झाली आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली. ( Kirit Somayya criticize MVA on Love Jihad )

किरीट सोमय्या आज (बुधवारी) नगर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘मागील काही वर्षात हिरवे विचार हे राज्यांमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून रुजले गेले होते. मात्र, आता याला आळा घालण्यात येईल. राज्यात भाजप-सेनेचे सरकार सत्तेवर आल्यापासून पीडित्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. मी त्यासंदर्भात पाठपुरावा सुरू केला आहे.

Love Jihad : भाजप खासदाराने ‘द केरळ स्टोरी’ दाखवूनही तिने धरला मुस्लिम प्रियकराचा हात…

नगर जिल्ह्यातील सात प्रकरणे माझ्याकडे आली आहे. त्यात कर्जतमधील दोन व नगर शहर परिसरातील पाच प्रकरणांचा समावेश आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेऊन परिस्थितीबाबत चर्चा केली. याशिवाय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन या सर्व प्रकरणांबाबत त्यांचे लक्ष वेधणार आहे.

Love Jihad : महाराष्ट्रातही कडक कायदा लागू होणार, आमदार राम शिंदेंची माहिती…

राज्यात किती महिला व मुली या मिसिंग आहे. याची एकत्रितपणे माहिती घ्यावी लागेल. लव्ह जिहाद प्रकारामध्ये पालकांनी तसेच समाजाने सुद्धा सजग राहणे गरजेचे आहे. केरला स्टोरीमुळे सध्या समाजामध्ये जनजागृतीही मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये ज्यांच्यावर अन्याय झाला आहे. असे पीडित कुटुंब आता पुढे येऊ लागले आहेत.

वास्तविक पाहता लव्ह जिहादच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. पोलीस प्रशासनेसुद्धा याची तत्काळ गांभीर्याने दखल घेणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून या विषयांना वेळीच आळा बसेल. लव्ह जिहाद संदर्भात कायद्यात दुरुस्ती अथवा नवीन कायदा करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. लव्ह जिहाद सारख्या प्रकारात राज्य सरकार गंभीर आहे. सरकारने पुढाकार घेतला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube