Love Jihad : भाजप खासदाराने ‘द केरळ स्टोरी’ दाखवूनही तिने धरला मुस्लिम प्रियकराचा हात…

Love Jihad : भाजप खासदाराने ‘द केरळ स्टोरी’ दाखवूनही तिने धरला मुस्लिम प्रियकराचा हात…

ज्या नर्सिंग विद्यार्थीनीला खासदार प्रज्ञा सिंह यांनी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट दाखवला तिच मुलगी एका मुस्लिम युवकासोबत पळून गेल्याचा प्रकार घडला आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये हा प्रकार घडला आहे.

LetsUpp Poll : धक्कादायक! 100 पैकी 80 जण म्हणतात…पंकजाताई तुम्ही भाजप सोडाच

खासदार प्रज्ञा सिंह यांनी या मुलीला चित्रपट दाखवल्यानंतर बॉयफ्रेंड युसूफपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. या तरुणीचे ३० मे रोजी लग्न होणार होते, मात्र त्यापूर्वीच ती प्रियकरासह घरातून पळून गेली.

युक्रेनचा रशियावर खेरसनमधील धरण फोडल्याचा आरोप; झेलेन्स्कींनी बोलावली आपत्कालीन बैठक

तिने आपल्यासोबत काही दागिने आणि रोख रक्कमही नेल्याचे सांगण्यात आले आहे. आता मुलीच्या कुटुंबियांनी भोपाळच्या कमला नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Eknath Shinde : आशियातील सर्वात मोठ्या क्लस्टर योजनेच्या कामाचा मुख्यमंत्र्यांकडून शुभारंभ, म्हणाले…

दरम्यान, द केरळ स्टोरी चित्रपट लव्ह जिहादवर आधारित आहे. त्यामुळे भाजपच्या अनेक नेत्यांनी आपल्या मतदारसंघातील मुलींना हा चित्रपट फ्रीमध्ये दाखवला होता. त्यानंतरही या मुलीवर कोणताही परिणाम झाला नाही.

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांत, शिर्डीसाठी महसूलमंत्र्यांनीं दिले 52 कोटी

हा चित्रपट दाखवल्यानंतर खासदार ठाकूर यांनी तु युसूफपासून दूर रहा असा सल्लाही दिला होता. तरीही मुलगी पळून गेली आहे. 19 वर्षांची मुलगी तिचं लग्न होण्याआधीच घरातून पळून गेली आहे.

सध्या ती युसूफ नावाच्या युवकासोबत स्वतःच्या इच्छेने राहत आहे. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या मुलीचा शोध घेतला. त्यानंतर तिने मी युसूफसोबतच राहणार असल्याचं पोलिसांना सांंगितलं आहे.

या मुलीच्या नावाने युसूफने कर्ज घेतलं असून तिला फूस लावून पळवून नेलं असल्याचा आरोप मुलीच्या वडिलांकडून करण्यात आला आहे. युसूफवर पाच-सहा गुन्हे दाखल आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube