Download App

अजितदादांसमोरच मुश्रीफांच्या डोळ्यांत पाणी; राजकारणातील संकटांचा उल्लेख करताना अश्रू अनावर

Hasan Mushrif : ‘आतापर्यंत जनतेने मला सहा वेळा निवडून दिले. आता माझी सातवी निवडणूक असेल. राजकीय जीवनात वावरताना माझ्यावर दोन वेळा राजकीय संकट आली परंतु, मतदार पाठिशी असल्यामुळे मी दोन्ही संकटं पेलून नेली’, अशा शब्दांत वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी कटू अनुभव सांगितला मात्र हे सांगत असताना त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांच्या मागे व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) स्वतः उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल (Kolhapur News) येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात हा प्रसंग घडला.

या मेळाव्यात मुश्रीफ पुढे म्हणाले, मी पहिल्यांदा विक्रमसिंह घाटगे यांचा कार्यकर्ता. छत्रपती शाहू कारखान्याचा मी संस्थापक, चेअरमन आणि व्हाइस चेअरमन. मला एकदा निवडणुकीत काढून टाकण्यात आल्यानंतर मी त्यांचं नेतृत्व सोडलं आणि मंडलिक साहेबांचे नेतृत्व स्वीकारलं. अशाच एका प्रसंगी माझ्यात आणि मंडलिक साहेबांत मतभेद झाले. या कठीण प्रसंगात तमाम जनतेने मला साथ दिली जनता माझ्याबरोबर राहिली. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सलग पाचवेळा निवडून देण्याची किमया केली.

Hasan Mushrif : ‘पृथ्वीराज चव्हाणांमुळेच आघाडीची सत्ता गेली’ मुश्रीफांचं रोखठोक प्रत्युत्तर

मिळालेली सत्ता गरीबांची आहे. त्यांना या सत्तेचा फायदा करून देणं हा त्यांचा अधिकार आहे. म्हणून रात्रीचा दिवस मी केला. मी अतिशय अभिमानानं सांगील ग्रामविकास खातं दादा तुम्ही माझ्याकडं दिलं 28 हजार ग्रामपंचायती होत्या 532 पंचायत समिती होत्या, जिल्हा परिषदा होत्या 28 हजार कोटींचं ते खातं होतं. त्यावेळी माझ्या मतदारसंघात मी शपथ घेतली कोण काय म्हणेल याचा विचार केला नाही.

माझ्या गावात मदत कधी कमी पडली असेल किंवा कधी जास्त झाली असेल. सरपंच माझा असेल किंवा नसेल परंतु त्या गावात एकही काम शिल्लक ठेवायचं नाही या भावनेने मी कामाला लागलो आणि आज किती निधी आणला हे मी सांगणार नाही पण 2024 ला मी माझी पुस्तिका काढेल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की गावागावात किती मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचं काम केलं.

Ajit Pawar : ‘मला फुकटचे सल्ले देऊ नका’ CM शिंदेंच्या अभिनंदनाच्या ‘गुगली’वर अजितदादा चिडलेच

follow us