Hatkanangale Loksabha Result : हातकणंगले (Hatkanangale) लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट समोर आलायं. मागील अनेक दिवसांपासून हातकणंगले मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरु होती. अखेर या मतदारसंघाचा निकाल हाती आलायं. हातकणंगलेच्या अतीतटीच्या लढतीमध्ये महायुतीचे उमदेवार (शिंदे गट) धैर्यशील माने (Dhairyashil Mane) यांनी गड कायम राखलायं. सुरुवातीला महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील (Satyajit Patil) आघाडीवर होते, मात्र, 18 व्या फेरीअखेर धैर्यशील माने यांनी 10 हजार 713 मतांचा लीड घेताच माने समर्थकांकडून जोरदार जल्लोष करण्यात आलायं.
Kolhapur Loksabha : कोल्हापुरकरांचं छत्रपतींच्या गादीलाच मत! शाहु महाराज एक लाखांच्या लीडने दिल्लीत…
लोकसभा निवडणुकीदरम्यान, या मतदारसंघात अनेक घडामोडी होत असल्याचं पाहायला मिळालं होतं. याचं मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे देखील मैदानात होते. तर महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील यांनी धैर्यशील माने यांना टफ फाईट दिलीयं. मतमोजणीच्या सुरुवातीला सत्यजित पाटील आघाडीवर होते. दोन्ही उमेदवारांमध्ये काहीशा मतांचाच फरक असल्याचं दिसून येत होतं. धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील यांच्यात कांटे की टक्करच सुरु होती. त्यानंतर माने यांनी 2 हजारांवर आघाडी घेतली. मतमोजणीदरम्यान, माने आणि सत्यजित पाटील यांच्यात कमी-जास्त मताधिक्य होत असल्याचं दिसून येत होतं. तर स्वाभिमानीचे राजू शेट्टी तिसऱ्या क्रमांकावर होते.
मराठवाडा लोकसभा निकाल अपडेट; बीडमध्ये पंकजा मुंडे अन् जालन्यात दानवे पिछाडीवर
दरम्यान, निवडणुकीदरम्यान, महायुतीचे धैर्यशील माने यांच्यासह महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी या तिन्ही उमेदवारांकडून विजयाची हमीच देण्यात येत होती. मात्र, प्रत्यक्ष मतमोजणीदरम्यान महायुतीच्या धैर्यशील माने यांनी आपला करिश्मा दाखवलायं. अखेरच्या फेरीदरम्यान, इचलकरंजी मतदारसंघाची मतपेटी फुटताच त्यांना 40 हजार मतांचा लीड मिळाला असल्याचं सांगितलं जात आहे. अद्याप निवडणूक आयोगाकडून धैर्यशील माने यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, काही वेळातच घोषणा होणार असल्याचं बोललं जातं आहे.
धैर्यशील माने यांनी 2019 साली तत्कालीन विद्यमान खासदार राजू शेट्टी यांचा पराभव केला होता. या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या बंडाचा परिणाम होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर खासदार पाच वर्ष दिसले नाहीत अशी चर्चा सुरू झाली. त्यांचा पत्ता कट होईल असे देखील बोलले जाऊ लागले होते, मात्र महायुतीकडून पुन्हा माने यांनाच मैदानात उतरवण्यात आलं होतं. तर दुसऱ्या महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी शड्डू ठोकला. अखेर या तिरंगी लढतीत धैर्यशील माने यांनीच बाजी मारलीयं.