महायुतीत धुसफूस! सर्व्हेमुळे उमेदवार बदलले अन् फटका बसला..; शिरसाटांचा रोख कुणाकडे

महायुतीत धुसफूस! सर्व्हेमुळे उमेदवार बदलले अन् फटका बसला..; शिरसाटांचा रोख कुणाकडे

Sanjay Shirsat on Loksabha Election result : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections राज्यात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) चांगलीच मुसंडी मारली. तर 45 पारचा नारा देणाऱ्या महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावे लागले. शिंदे गटाला केवळ 7 जागा मिळाल्यानं त्यांची पिछेहाट झाली. दरम्यान, या निकालानंतर महायुतीत धूसपूस दिसत आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसा (Sanjay Shirsat यांनी खळबळजनक वक्तव्य केलं.

देशात पुन्हा मोदी सरकार! चंद्राबाबू नायडू – नितीश कुमारकडून समर्थन, ‘या’ दिवशी होणार शपथविधी 

निवडणुक निकालानंतर आज संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना शिरसाट म्हणाले की, लोकसभेच्या निकालांबाबत जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. पण, इतरांवर टीका करण्याऐवजी आम्हाला चुका दुरुस्त करणं गरजेचं वाटतं. खरंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचा केंद्रबिंदू हा सर्व्हे होता. याने एक सर्व्हे आणला, त्याने एक सर्व्हे आणला, हा सर्व्हे हे सांगतोय, तो सर्व्हे ते सांगतोय, यामुळं आम्हाला ओव्हर कॉन्फिडन्स आला आणि याचा आम्हाला फटका बसला, असं शिरसाट म्हणाले.

‘फक्त एका व्यक्तीचं महत्त्व कमी करण्यासाठी…’, निकालानंतर भाजपमध्ये वॉर, मोहित कंबोज यांचा रोख कोणाकडे? 

जागा वाटप झाल्यानंतर ऐनवेळी उमेदवार बदलेले त्यामुळं उमेदवाराला कमी वेळ मिळाला. उमेदवार मतदारापर्यंत पोहोचेपर्यंत अनेक राजकारण घडलेलं असतं. यावर कधीतरी चर्चा झाली पाहिजे, असं शिरसाट म्हणाले. राहिला प्रश्न निकालाचा तर आम्ही 15 पैकी फक्त 7 जागा जिंकल्या आहेत. त्यानुसार, आमचा स्ट्राइक रेट चांगला आहे, असं शिरसाट म्हणाले.

दरम्यान, भाजपने विविध सर्व्हेचा हवाला देत शिंदेंना उमेदवार बदलण्यास सांगितलं होतं, अशी चर्चा होती. त्यामुळं आता संजय शिरसाट यांचा रोख कोणाकडे आहे हे सांगण्याची गरज नाही.

तर अमोल मिटकरींनीही बारामतीत अजित पवारांनी मित्रपक्षांच्या ज्या नेत्यांवर विश्वास टाकला त्यांनी मदत केली नाही, त्यामुळं आमचा पराभव झाल्याचं विधान केलं. या सर्व घडामोडींमुळे महायुतीतील तिन्ही घटक पक्ष एकत्र विधानसभा निवडणूक कशी लढवणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube