देशात पुन्हा मोदी सरकार! चंद्राबाबू नायडू – नितीश कुमारकडून समर्थन, ‘या’ दिवशी होणार शपथविधी
Modi Government : लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Results) जाहीर होताच देशाची राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली दिसत आहे. 4 जून रोजी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएला (NDA) तिसऱ्यांदा बहुमत मिळाला आहे.
यावेळी देशात एनडीएने 293 जागा जिंकले आहे मात्र भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप स्वबळावर सरकार स्थापन करू शकत नाही यामुळे त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी एनडीएमधील इतर घटक पक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे.
यामुळे आज दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एनडीएची बैठक झाली आहे. या बैठीकीमध्ये चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) आणि नितीश कुमार (Nitish Kumar) देखील उपस्थित होते.
समोर आलेल्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये एनडीएमध्ये सर्व पक्षांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींची एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. यामुळे आता 7 जून रोजी दिल्लीमध्ये एनडीएच्या सर्व निवडून आलेल्या खासदारांची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे आणि यानंतर एनडीए राष्ट्रपतींकडे सत्तास्थापेनाचा दावा करणार आहे. तर 8 जून रोजीच तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ नरेंद्र मोदी घेऊ शकतात अशी शक्यता आहे.
आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे तो राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला असून नवीन सरकार स्थापन होईपर्यंत तुम्ही काम करा असं राष्ट्रपतींनी त्यांना सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत, ज्या बहुमतापेक्षा 32 कमी आहेत. यामुळे भाजपला तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी जेडीयू, टीडीपीसह अनेक राजकीय पक्षांच्या पाठिंब्याची गरज आहे.