सांगली : मिरजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शनिवारी सांगली जिल्ह्यातील बेडगे येथे पक्ष प्रेवेश मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात सांगली जिह्यातील काँग्रेस आणि भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रेवेश करणार आहेत. अशी माहिती सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोज शिंदे यांनी माध्यमांना दिली. हे पक्ष प्रवेश घडून आणत जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा काँग्रेससोबत भाजपाला मोठा धक्का दिला आहे.
Ajit Pawar : फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याचा प्लॅनवर अजितदादांचे थेट उत्तर
हे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्याने प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. यामध्ये मिरजेतील माजी पंचायत समिती सभापतींसह विविध नेते, तसेच मिरज विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच, सोसायटी अध्यक्ष आणि विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
यामध्ये माजी सभापती दिलीप बुरसे, बापूसाहेब बुरसे, रंगराव पाटील, कलगोंडा पडसलगे, वसंतराव गायकवाड, अविनाश पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, कार्याध्यक्ष ॲड बाबासाहेब मुळीक, जिल्हा बॅंकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, बाळासाहेब ओमासे, या काही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
‘बंगाली प्रेम…’ ममता यांनी केंद्राकडे पश्चिम बंगालमध्ये अफूची लागवड करण्याची परवानगी मागितली
सांगली जिल्ह्याचे राजकारण नेहमीच जयंत पाटील यांच्या भोवती फिरत असते. सांगली जिल्ह्यात जयंत पाटील पाटील यांच्या नेतृत्वात राष्टवादी काँग्रेस पक्ष नेहमीच वरचढ राहिला आहे. या अगोदर देखील जयंत पाटील यांनी शेकडो कार्यकत्यांचा पक्षात प्रवेश घडून आणला आहे. सांगली जिल्ह्यात भाजप आणि काँग्रेसची जयंत पाटील यांच्या खेळीकडे बारीक नजर असते परंतु या सर्वांच्या पलीकडे जाऊन जयंत पाटील हे सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवत आहेत.