कोल्हापूर हादरलं! करणीचा संशय; जेवायला बसलेल्या शेजाऱ्यावर तलवारीने सपासप वार

Killed in Kolhapur on suspicion of doing Karni : करणी केल्याच्या संशयावरून घरात घुसून एका व्यक्तीचा तलवारीने (sword) वार करून निर्घृण खून (Atrocious murder) केल्याची घटना कोल्हापूर शहरात घडली आहे. आझाद मुकबुल मुलतानी (वय ४८ वर्षे) (Azad Muqbul Multani) असे मृताचे नाव आहे. त्यांच्यावर हल्ला होत असतांना बचाव करण्यासाठी गेलेली त्यांची सुनही हल्ल्यात जखमी झाली. […]

FIR Against Ex MD Of BharatPe, Family For Allegedly Defrauding The Fintech Of ₹81 Crore (46)

FIR Against Ex MD Of BharatPe, Family For Allegedly Defrauding The Fintech Of ₹81 Crore (46)

Killed in Kolhapur on suspicion of doing Karni : करणी केल्याच्या संशयावरून घरात घुसून एका व्यक्तीचा तलवारीने (sword) वार करून निर्घृण खून (Atrocious murder) केल्याची घटना कोल्हापूर शहरात घडली आहे. आझाद मुकबुल मुलतानी (वय ४८ वर्षे) (Azad Muqbul Multani) असे मृताचे नाव आहे. त्यांच्यावर हल्ला होत असतांना बचाव करण्यासाठी गेलेली त्यांची सुनही हल्ल्यात जखमी झाली. या घटनेनंतर हल्लेखोर निखिल रवींद्र गवळी (वय २२ वर्षे) याने आपणहून राजाराम पोलिसांच्या (Rajaram Police) स्वाधीन केले. दरम्यान, या थरकाप उडवणाऱ्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टेंबलाई उड्डाणपुलाला लागून असलेल्या बीएसएनएल टॉवरसमोरील झोपडपट्टी परिसरात ही घटना घडली. मंगळवारी (16 मे) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मुलतानी कुटुंब एकत्र जेवायला बसले होते. हल्लेखोर निखिल आणि मुलतानी यांची कुटुंब झोपडपट्टी परिसरात एकाच गल्लीमध्ये राहतात. निखिल गवळी हा एक टेम्पो चालक आहे, तर मुलतानी हे सेंट्रिंगची कामे करतात. काल रात्री मुलतानी कुटुंब त्यांच्या घराच्या बाहेरच्या खोलीत एकत्र जेवण करण करत होते. त्यावेळी निखिल तलवार घेऊन त्यांच्या घरात घुसला.

यावेळी जेवण करत असलेल्या आझात यांच्यावर निखिलने सपासप वार केले. यावेळी आझाद यांच्या सोबत जेवण करत असलेली त्यांची सून अफसाना हिने निखिलच्या अंगावर धावून तिने हल्ल्याचा प्रतिकार केला. यामध्ये ती जखमी झाली. निखिलने आझाद यांच्यावर सपासप सात ते आठ वार केले. हल्ल्यादरम्यान आरडाओरडा झाल्यानंतर शेजारी धावत आले. त्यावेळी निखिल तलवार घेऊन निघून गेला. यावेळी घरात सगळीकडे रक्ताचा सडा पडला होता.

Shinde VS Thackeray : ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या बैठकीपूर्वीच ठाकरेंना मोठा धक्का

दरम्यान, शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना देऊन रक्ताने भिजलेल्या आझादला तातडीने ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. मात्र, आझाद यांचा मृत्यू झाला. सीपीआरमध्ये आझादचा मुलगा तौसीफ याने पोलिसांना सांगितले की, निखिलने याने आपल्या वडिलांची हत्या केली. दरम्यान, खून करून घराबाहेर पडलेला निखिल राजारामपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला. आझाद करणी करत असल्याने ही हत्या केल्याची कबुली त्याने दिली.

Exit mobile version