Sugar Cane Farmers Agitation : मागील वर्षातील उसाचे 400 रुपये आणि चालू हंगामात ऊसाला साडेतीन हजार रुपये दर मिळावा या दोन प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन सुरू केले आहे. दिवसेंदिवस आंदोलन तीव्र होत चालले आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज सहकार विभागाकडून आयोजित करण्यात आलेली बैठकही निष्फळ ठरली. त्यामुळे आता हे आंदोलन आधिक चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. उद्या गुरुवारी पुणे बंगळुरू महामार्गावर चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पोलीस या आंदोलनासाठी जाता येऊ नये म्हणून रोखतील तरीदेखील कोणत्याही परिस्थितीत आंदोलन होणार. पदाधिकारी नसले तरी आंदोलन होणार. पोलिसांना गुंगारा देऊन आंदोलनस्थळी या, असे आवाहन माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केले.
Raju Shetti : ‘ईडी’च्या भीतीने उंदरासारखे पळाले; राजू शेट्टींच्या निशाण्यावर नेमकं कोण?
ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी बैठक झाली. परंतु, या बैठकीत तोडगा निघू शकला नाहीत. कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होती. जे कारखाने थकबाकी देतील त्या कारखान्यांना गाळपासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी होती. मागील वर्षाचं काही मागू नका यंदाचं बघू असं कारखानदारांचं म्हणणं होतं. मागील वर्षातील दुसऱ्या उचलीतील चारशे रुपये आम्ही मागत आहोत. पण, आता आंदोलन होणार आहे. सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी, असेही संघटनेचे राज्याध्यक्ष जालिंदर पाटील यांनी सांगितले.
राजू शेट्टी म्हणाले, जोपर्यंत मागील वर्षातील तुटलेल्या उसाचे चारशे रुपये मिळत नाहीत तोपर्यंत माघार घेण्याचा काहीच प्रश्न येत नाही. कोणत्याही परिस्थितीत हे आंदोलन होणारच आहे. आंदोलनाआधी पोलीस पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतील. पदाधिकारी नसले तरी आंदोलन होणार. कुणीही प्रमुख नसला तरी आंदोलनाला जायचं आहे. पोलिसांना गुंगारा देऊन आंदोलनस्थळी यायचं आहे. प्रत्येक घरातला माणूस आंदोलनाला यायला पाहिजे.