Download App

Kolhapur : कॉलेज तरुणांनी पेटवलं कोल्हापूर; आक्षेपार्ह स्टेटसचा पोलिसांनी सांगितला सविस्तर घटनाक्रम

कोल्हापूर : पेटलेल्या कोल्हापूर (Kolhapur) शहरातील परिस्थिती आता हळू हळू पूर्वपदावर येत आहे. तणाव निवळत असून अनेक भागांतील दुकाने सुरु झाली आहेत. शहरात 2 दिवसात झालेल्या राड्याप्रकरणी 3 पोलीस स्थानकांमध्ये 3 गुन्हे दाखल करण्यात आले असून यात सुमारे 400 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच 36 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. ते आज (8 जून) पत्रकार परिषदेत बोलत होते. (Kolhapur-riots-sp-Mahindra-pandit-told-about -current-Kolhapur-situation)

काय म्हणाले पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित?

शहरात तगडा पोलीस बंदोबस्त :

पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित म्हणाले, शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या 4 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय 1 अतिरिक्त पोलीस अधिक्षक, 2 पोलीस उपाधिक्षक, 10 पोलीस निरिक्षक, 60 पोलीस उपनिरीक्षक, 300 पोलीस कर्मचारी, 500 होमगार्ड्स असा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोबतच इचलकरंजी, गडहिंग्लज, आजरा इकडे अतिरिक्त कुमक पाठवली आहे.

Kolhapur : तणावपूर्ण शांतता, तगडा बंदोबस्त… : पेटलेल्या कोल्हापूरमध्ये काय आहे सद्यस्थिती?

आजपासून जिल्हा पोलीस दला करता 1 हजार 500 हजार होमगार्ड उपलब्ध करून दिले आहेत, त्यांचा देखील बंदोबस्तासाठी आम्ही वापर करत आहोत. त्याचबरोबर पुणे येथून 2 अतिरिक्त एसआरपीएफच्या दोन कंपनी मिळालेल्या आहेत. याशिवाय सांगली आणि सातारा या जिल्ह्यातून 10 अधिकारी आणि 100 कर्मचारी एवढे संख्याबळ माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाने आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे.

संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि शहरांमध्ये राऊंड द क्लॉक 24 तास जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण जिल्हाभरामध्ये पेट्रोलिंग ठेवण्यात आलेले आहे. आक्षेपार्ह स्टेटस किंवा अशा गोष्टी कोणी ठेवत असेल आणि ते जर रिपोर्ट झालं तर त्या अनुषंगाने तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे देखील निर्देश जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी त्याचबरोबर सर्व पोलीस स्टेशनला देण्यात आलेले आहेत.

इंटरनेट सेवा आज रात्रीपर्यंत बंद राहणार :

दरम्यान, काल अफवांना आळा बसावा आणि खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी शहरातील आणि जिल्ह्यातील इंटरनेट सेवा कालपासून बंद केली आहे. ही इंटरनेट सेवा आज रात्री 12 वाजेपर्यंत बंदच राहणार आहे. तोपर्यंत तणाव पूर्णपणे निवळलेला असेल. आताच अनेक भागांतील दुकाने सुरू झाली आहेत, अशी माहितीही पोलिस अधीक्षकांनी दिली.

अक्षेपार्ह स्टेटस ठेवणारी मुलं कॉलेजला जाणारी :

महेंद्र पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, आक्षेपार्ह स्टेटसच्या अनुषंगाने  जे आरोपी ताब्यात घेतले आणि ज्यांना अटक करण्यात आली प्राथमिक माहितीनुसार, ती कॉलेजला जाणारी ही तरुण मुलं आहेत. एकमेकांच्या स्टेटसवरून ते स्टेटस कॉपी करून त्यांनी स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटर पोस्ट केलं. प्राथमिक चौकशीमध्ये इंटरनेटवरून सदर व्हिडिओ मिळाले व ते स्टेटस म्हणून वापरले अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. सदर व्यक्तींचे मोबाईलचा आम्ही परीक्षण सुरू केले आहे.

अटक केलेल्यांमध्ये 3 जण अल्पवयीन :

महेंद्र पंडित यांनी सांगितले की, दुकाने पूर्णपणे उघडल्यानंतर पोलीस तिथल्या सीसीटीव्हीचा तपास करुन गुन्हा दाखल करतील. आतापर्यंत 36 जणांना अटक केली आहे. यातील 3 जण अल्पवयीन आहेत. या तिघांना बाल न्यायालयात हजर करून पुढील कारवाई केली जाईल. दंगलीला जबाबदार असलेल्यांपैकी कुणाचीही गय करणार नाही.  पोलिस सर्वांवर कारवाई करतील, असे आश्वासन त्यांनी दिले. तसंत या मुलांना हे स्टेट्स ठेवण्यासाठी कुणी प्रवृत्त केले होते का?, याचा शोध घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

कोल्हापूरचा इतिहास समाज परिवर्तनाचा; नगर, कोल्हापूरच्या दंगलीनंतर पवारांचं मोठं आवाहन

अंदाज होता.. मग घटना कशी घडली?

स्टेटस ठेवल्यावरून जेव्हा गुन्हे दाखल परवा ज्यावेळेस आक्षेपारी स्टेटस ठेवल्यावरून जेव्हा गुन्हे दाखल पोलीस स्टेशनला झाले त्यावेळेस जे बंदच आवाहन करण्यात आलेल होत त्या अनुषंगाने अतिरिक्त बंदोबस्त हा शहरांमध्ये तैनात केलेला होता असं नाहीये की तिचं बंदोबस्त नव्हता अतिरिक्त अधिकारी अतिरिक्त फोर्स त्याचबरोबर एसआरपीएफ ची कंपनी व एक प्लाटून त्याचबरोबर जे जवळपासचे पोलीस स्टेशन आहेत तेथून देखील अतिरिक्त अधिकारी व कर्मचारी हे संपूर्ण शहरांमध्ये देण्यात आलेले होते त्यानंतर असं नव्हतं की आम्हाला माहित नव्हतं की एवढा जमा जमवू शकतो कारण परवा जी घटना घडली आणि आपण जे सांगताय त्याप्रमाणे मागील पाच सहा महिन्यांमध्ये ज्यावेळेस आंदोलन झाली आणि त्याचं रूपांतर नंतर काही तणावांमध्ये झालेला आहे तर ज्यावेळेस जमाव जमतो तो परत जाताना या घटना घडल्या आहेत मागच्या चार-पाच महिन्यामध्ये त्याचा देखील अंदाज आम्हाला होता

Tags

follow us