Download App

LokSabha election: महादेव जानकर माढ्यातूनच लोकसभा लढविणार; रासपच्या नेत्याने सांगितलं ‘प्लॅनिंग’

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Mahadev Jankar will Contest LokSabha elections from Madha : सध्या लोकसभा निवडणुकीचे (LokSabha election) वारे वाहत आहे. सत्ताधारी भाजपसह (BJP) सर्व राजकीय पक्ष आपल्या आपल्या ताकदीनुसार आगामी निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटप अद्याप झालेले नाही. काही ठिकाणी जागा वाटपाचा पेच आहे. त्यात आता राष्ट्रीय समाज पक्षाचे (Rashtriya Samaj Party) अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. ते माढा मतदारसंघाची का निवड करत आहेत, याचे कारणे राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा नेते अजित पाटील यांनी दिलेत.

Jayant Patil : शेलार अन् कदमांना समज द्या, योगेश सावंतावरून जयंत पाटलांनी सत्ताधाऱ्यांना दाखवला आरसा

अजित पाटील (Ajit Patil) यांच्याशी लेट्सअपने संवाद साधला. अजित पाटील म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकार यांनी आपल्या काळात राज्यासाठी खूप कामे केली आहेत. यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाने जानकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातून दिल्लीला पाठवायचा संकल्प केला आहे. फलटण, खटाव, माण तालुक्यातील गावांमध्ये गेलो होतो. माढा लोकसभा मतदारसंघातील लोकांमध्ये सध्या विद्यमान खासदारांबद्दल निराशा आहे. या मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत कोणतेही विकासकामे पूर्ण झालेली नाही, असा आरोपही अजित पाटील यांनी केला आहे.

डिनर डिप्लोमसीवर शरद पवार ‘हिट विकेट’; CM शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आग्रहाचं निमंत्रण नाकारलं

या मतदारसंघाचे आणि महादेव जानकर यांचे एक वेगळे नाते आहे. महादेव जानकर हे माण तालुक्यातून येतात. त्यांचा तालुका या मतदारसंघात आहे. जानकर यांनी 2009 मध्ये देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी पक्षाचा विस्तार झालेले नव्हता. माढा मतदारसंघात शरद पवार यांनी पावणे पाच लाख मते घेतली होती. सुभाष देशमुख यांनी दोन लाख मते घेतली होती. तर जानकर यांना एक लाखांपेक्षा जास्त मते घेतली होती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे जानकर यांनी माढातून निवडणूक लढावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

लोकसभा लढविण्याच्या दृष्टीने तयारी

महादेव जानकर हे परभणी किंवा माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी करत आहे. परंतु ते माढा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे अजित पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले. माढा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाचा विचार केला. तर सातारा जिल्ह्यातील माण व फलटण हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, करमाळा, माळशिरस व माढा हे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. दोन्ही महिन्यापासून येथे पक्षाचे पदाधिकारी तयारी करत आहे. प्रदेश कमिटी, विभागीय व जिल्ह्याचे पदाधिकारी अशा तिघांची कमिटी आहे. एका कमिटीला एका विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. ते दोन महिन्यापासून मतदारसंघात जावून तयारी करत आहेत. या मतदारसंघातील जातीय समीकरणे वेगळी असली तर जानकरांना मानणारा मतदार आहे. त्यामुळे जानकर हे निवडणूक लढतील आणि विजयाचा गुलालही उधळतील, असा विश्वासही अजित पाटील यांनी व्यक्त केला आहे.

follow us

वेब स्टोरीज