Dharyashil Mane : पुढील काही तासांतच माझी उमेदवारी जाहीर होणार असल्याचा दावा शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार धैर्यशील माने (Dharyashil Mane) यांनी केला आहे. दरम्यान, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Loksabha Election) अद्याप महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. हातकणंगलेची जागा शिंदे गटाकडे असून धैर्यशील माने या मतदारसंघात विद्यमान खासदार आहेत. अशातच माने यांचं तिकीट कापलं जाणार असल्याच्या वावड्या उठल्या आहेत. त्यावर बोलताना माने यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळणार असल्याचा दावा केला आहे.
‘आता योग्य वेळ आलीये..’; 4 राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या बॉलिवूडची ‘क्वीन’ची राजकारणात एन्ट्री
खासदार माने म्हणाले, मी कोणत्याही वादात पडत नाही, आपल्या मतदारसंघातील विकासात्मक दृष्टीनेच पाऊल उचलत आलो आहे. मी कोणताही नकारात्मक विचार करीत नाही. त्यामुळे विरोधकांना असं वाटत असेल की माझं तिकीट कापणार आहे पण अशी अपेक्षा करणारे लोकं वेगळी आहेत. पुढील काही तासांतच माझी उमेदवारी जाहीर होणार असल्याचा दावा धैर्यशील माने यांनी व्यक्त केला आहे.
Police Bharti 2024 : ठाणे पोलीस दलात ६८६ रिक्त पदांसाठी भरती, कधीपर्यंत करता येणार अर्ज?
माझं तिकीट कापलं जाणार ही अफवाच असून जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. माझी उमेदवारी निश्चित झाल्यानंतर या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने मी महायुतीचा खासदार म्हणून निवडून येणार आहे. महायुतीतील तीन पक्षांमध्ये चर्चा सुरु असल्याने उमेदवारी घोषित करण्यात उशिर होत आहे, मात्र पुढील काही तासांतच माझी उमेदवारी जाहीर केली जाणार असल्याचं माने यांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबई मेट्रो रेल्वेमध्ये नोकरीची संधी, महिन्याला दोन लाख रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज?
दरम्यान, महायुतीसह अद्याप महाविकास आघाडीकडूनही हातकणंगलेच्या जागेवर अद्याप उमेदवाराची नावे घोषित करण्यात आलेली नाहीत. मागील काही दिवासांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. महाविकास आघाडीकडून राजू शेट्टी हेच उमेदवार असतील असंही सांगण्यात येत होतं. हातकणंगलेच्या जागेसाठी राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवरही भेट घेतल्याचं दिसून आलं होतं. मात्र अद्याप महायुतीसह महाविकास आघाडीकडून या जागेसाठी उमदेवार निश्चित करण्यात आलेले नाहीत.