Download App

कोल्हापूर, साताऱ्यात जमीन हादरली! भूकंपाच्या सौम्य धक्क्याने नागरिक भयभीत

Earthquake : देशात ठिकठिकाणी भूकंपाचे (Earthquake) धक्के बसत आहेत. उत्तर भारतातील अनेक ठिकाणी भूकंप झाला होता. त्यानंतर आज3 महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून फक्त 5 किलोमीटर खाली होता.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किलोमीटर खाली होता. कोल्हापुरपासून 76 किलोमीटर अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. आज सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी हा भूकंप झाला.

भारत-बांग्लादेश सीमेवर भूकंप, 5.4 रिश्टर स्केल तीव्रतेने परिसर हादरला

सातारा जिल्ह्यातील पाटण शहरालगत गावांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे 6 वाजून 40 मिनिटांनी हा भूकंप झाला. सकाळच्या वेळी फिरायला निघालेल्या लोकांमध्ये घबराट पसरली. कोयना धरणापासून वीस किलोमीटर अंतरावर भूकंपाचे धक्के बसले. सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याआधी जुलै महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भूकंप झाला होता. जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात हा भूकंप झाला होता. माडखोल, कलंबिस्त, सरमळे, ओटवणे, कारिवडे, कोनशी, भालावल, ओवळीये, धवडकी या गावांत मोठा आवाज झाला होता. काही काळ जमीनही हादरली होती. त्यानंतर असाच भूकंप आता कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात आज झाला आहे.

Shimala Landslide : हिमाचल प्रदेशमध्ये हाहाकार! शिमलामध्ये श्रावणी सोमवारीच शिव मंदिरावर कोसळली दरड

दरम्यान, मागील काही दिवसांपासून देशात सातत्याने भूकंपाच्या घटना घडत आहेत. भारतच नाही तर पाकिस्तान, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, चीन या देशातही भूकंप होत आहेत. भारतात दिल्ली, आसाम, उत्तराखंड, राजस्थान, हिमाचल प्रदेश, अंदमान निकोबार बेटांवर भूकंप झाला होता. या घटनांनी लोकांत घबराट पसरली आहे. भूगर्भात होत असलेल्या हालचालींमुळे ऐन पावसाच्या दिवसात या संकटाचा सामना लोकांना करावा लागत आहे.

भारत-बांग्लादेशवर सीमेवर भूकंप

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला एक धक्कादायक बातमी समोर आली होती. भारत आणि बांग्लादेशच्या सीमेवर भूकंप झाल्याची घटना घडली. सोमवारी रात्री 8 : 20 वाजण्याच्या सुमारास भूकंप झाल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राकडून देण्यात आली. या भूकंपामुळे ईशान्य भारतातील परिसरालाही धक्के बसले.

 

Tags

follow us