करमाळ्यात ट्वि्स्ट! शिंदेंचा उमेदवार असताना अजितदादांची अपक्षाला साथ? म्हणाले..

करमाळ्यात शिंदे गटाने दिग्विजय बागल यांना तिकीट दिलं आहे. तरी देखील अजित पवार यांनी अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना निवडून देण्याचं आवाहन केलं आहे.

Ajit Pawar And Sanjay Shinde

Ajit Pawar And Sanjay Shinde

Ajit Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी (Maharashtra Elections 2024) जोरात सुरू आहे. स्टार प्रचारकांच्या सभांनी राजकारण ढवळून निघालं आहे. काही मतदारसंघात बंडखोरी उफाळून आली आहे. पक्षाचा आदेश डावलत उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडे अशी परिस्थिती दिसून येत आहे. यातच आता करमाळा विधानसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे.

या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने दिग्विजय बागल यांना तिकीट दिलं आहे. तरी देखील अजित पवार (Ajit Pawar) यांनी अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना निवडून देण्याचं आवाहन केलं आहे. लाल सफरचंद, शिमल्याचे सफरचंद असेही अजित पवार म्हणाले आहेत. संजय शिंदे यांना सफरचंद निवडणूक चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे अजितदादांनी सफरचंदांचा उल्लेख केला.

माढा लोकसभेची निवडणूक सोपीच; चंद्रकांत पाटलांनी मांडले संपूर्ण गणित

मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार यशवंत माने यांच्या प्रचारासाठी अजित पवार आले होते. यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. त्यांच्या या आवाहनानंतर महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीतील शरद पवार गटाने नारायण पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीने शिंदे गटाचे दिग्विजय बागल यांना तिकीट दिलं आहे. विद्यमान आमदार संजय शिंदे मात्र अपक्ष लढत आहेत. आता अजित पवार यांनी संजय शिंदे यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनानंतर ऐन निवडणुकीत महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

Exit mobile version