Hasan Mushrif : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता याच पक्षाच्या दोन गटांतील नेते एकमेकांवर तुटून पडले आहे. काल कोल्हापूर येथे झालेल्या शरद पवार गटाच्या निर्धार सभेत आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यावर आता हसन मुश्रीफही (Hasan Mushrif) जोरदार प्रत्युत्तर देत मैदानात उतरल आहेत.
मुश्रीफ यांना आज प्रसारमाध्यमांनी आव्हाड यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारले. त्यावर मुश्रीफांनी खोचक प्रत्युत्तर दिले. जितेंद्र आव्हाड मला फार ज्युनिअर आहेत. त्यांनी शरद पवारांवर काय जादू केली हे मला माहिती नाही. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवण्याचं काम त्यांनी केलं. अशी भाषा त्यांनी बोलायला नको होती.
‘बच्चू कडू कोण बाबा?’ गल्लीबोळातल्या लोकांवर..; कडूंच्या ‘त्या’ वक्तव्यावर पवारांचा खोचक टोला
जेव्हा एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले, तेव्हाच राष्ट्रवादीच्या 53 आमदारांनी शरद पवारांना पत्र लिहीलं होतं की आम्हालाही सत्तेत जाण्याची परवानगी द्या. म्हणजे गृहनिर्माण खातं किती हृदयाला कवटाळून बसले होते. मग तेव्हा कशी सही केली होती तुम्ही? कोल्हापुरात कोल्हापुरी चप्पल नाही, कापशाची चप्पल प्रसिद्ध आहे. ती करकर वाजते. ती बसली की कळेल त्याला, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.
महाराष्ट्रात आता गद्दारी दिसू लागली आहे. हे साप बिळात होते. बिळातले साप आता बाहेर पडू लागले आहेत. या सापांना ठेचण्यासाठी आपापल्या पायतानाचा वापर करावा लागेल. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे या कोल्हापुरात सर्वात प्रसिद्ध काय आहे? पायतान. या पायतानाचा उपयोग अख्ख्या महाराष्ट्राने करावा अशी माझी इच्छा आहे, असे आमदार आव्हाड यांनी कालच्या सभेत सांगितले होते.
Sharad Pawar यांचे अजित पवारांना परत आणण्याचे प्रयत्न; काँग्रेसच्या आमदाराचा गौप्यस्फोट