Sharad Pawar यांचे अजित पवारांना परत आणण्याचे प्रयत्न; काँग्रेसच्या आमदाराचा गौप्यस्फोट

Sharad Pawar यांचे अजित पवारांना परत आणण्याचे प्रयत्न;  काँग्रेसच्या आमदाराचा गौप्यस्फोट

Kailas Gorantyal on Sharad Pawar : शरद पवार (Sharad Pawar) हे देशाचे तसेच राष्ट्राचे नेते आहेत त्यांच्या प्रत्येक शब्दात ते गुगली टाकतात यात कोणाची विकेट पडेल ते सांगता येत नाही. तर अजित पवारांना परत आणून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याचे शरद पवारांचे (Sharad Pawar) प्रयत्न आहे. अशी आम्हाला खात्रीलायक माहिती आहे. असा गौप्यस्फोट काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

अकलेचा मुद्दा बावनकुळेंना झोंबला; बेल ऑर्डरची आठवण करून देत टोचले कान

काय म्हणाले आमदार कैलास गोरंट्याल?

आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले, शरद पवार (Sharad Pawar) हे ज्येष्ठ नेते आहेत. अजित पवारांना परत आणून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याची शरद पवारांचे प्रयत्न आहे अशी आम्हाला खात्रीलायक माहिती आहे. तसेच त्यांच्या प्रत्येक शब्दात ते गुगली टाकतात यात कोणाची विकेट पडेल ते सांगता येत नाही.

Dream Girl 2: आयुष्मानच्या ‘ड्रीम गर्ल २’ची बॉक्स ऑफिसवर जादू; कमावले इतके कोटी

तसेच शरद पवारांनी (Sharad Pawar) अजित पवारांच्या गटाला त्यांचा फोटो लावायचा सांगितला नाही. तरीही ते लोक फोटो का लावतात? हे 2024 साठी पार्टी वाढवण्याचे प्रयत्न आहे. मात्र हे लोक परत फिरणार आहेत. परतीचा पाऊस लवकरच येईल. तर अजित पवारांना शेवटचा चान्स आहे हे शरद पवार विचार करूनच बोलले असतील, त्यांच्या प्रत्येक शब्दाला वेगळा अर्थ असतो. तसेच शरद पवारांसाठी लोक स्वतः पैसे देऊन येतात मात्र यांच्या सभेसाठी पैसे देऊन आणावे लागतात. असा टोला ही आमदार कैलास गोरंट्याल यांनी अजित पवार गटाला लागावला आहे.

तर आमदार कुचे यांनी म्हाडाचे घर वापस करण्याचा निर्णय घेतला आहे तो त्यांचा वैयक्तिकत प्रश्न आहे मला त्याबद्दल माहीत नाही. असं यावेळी गोरंट्याल म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांच्यावर देखील टीका केली त्यावेळी ते म्हणाल की, रावसाहेब दानवे माझे मित्र आहेत मात्र अब्दुल सत्तार माझा मित्र नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube