अकलेचा मुद्दा बावनकुळेंना झोंबला; बेल ऑर्डरची आठवण करून देत देशमुखांचे टोचले कान

  • Written By: Published:
अकलेचा मुद्दा बावनकुळेंना झोंबला; बेल ऑर्डरची आठवण करून देत देशमुखांचे टोचले कान

नागपूर :  राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची अक्कल काढली होती. त्यांची ही टीका भाजप नेते बावनकुळेंना चांगलीच झोंबली असून, त्यावर प्रत्युत्तर देताना बावनकुळेंनी देशमुखांना त्यांना मिळालेल्या बेल ऑर्डरची आठवण करून देत त्यांचे कान टोचले आहेत. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

Sharad Pawar : राष्ट्रवादीत फूट का पडलेली नाही? शरद पवारांनी सांगितलं शास्त्रीय कारण

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर देत बावनमुळे यांची मुळातच उंची कमी असून त्यांनी अक्कल शिकवण्याची गरज नसल्याचे म्हटले होते.

त्यानंतर आज बावनकुळेंनी देशमुखांना प्रत्युत्तर देत त्यांना मिळालेल्या बेल ऑर्डरची आठवण करून दिली आहे. ते म्हणाले की, अनिल देशमुख सध्या जमीनावर बाहेर आहेत. बहुदा त्यांनी ऑर्डर बरोबर वाचलेली नाही. त्यांचे अशाप्रकारची विधाने आणि टीका हे एकप्रकारे जमीनाच्या अटीशर्तीचा भंग करण्यासारखेच आहे.

Sharad Pawar यांचे अजित पवारांना परत आणण्याचे प्रयत्न; काँग्रेसच्या आमदाराचा गौप्यस्फोट

अनिल देशमुख आमचे मित्र असून, मी शरद पवार यांना काही बोललो नाही, त्यांच्या भूमिकेवर बोललो असे यावेळी बावनकुळेंनी स्पष्ट करत पक्षात फूट पडली नाही असे शरद पवार, सुप्रिया सुळे बोलतात त्यावर आपण बोलल्याचे यावेळी ते म्हणाले. शरद पवार यांना निर्णय घ्यायचा अधिकार असल्याचेही यावेळी बावनकुळेंनी सांगितले.

काँग्रेसला दाखवण्यासाठी वडेट्टीवार असे बोलत आहेत

यावेळी बावनकुळेंनी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारांचादेखील समाचार घेतला. ते म्हणाले की, वडेट्टीवर नवीन नवीन विरोधी पक्ष नेते झाले आहेत. वडेट्टीवार जर ईडी सीबीआयवर असा अविश्वास दाखवणार असतील तर, देशात काहीच राहणार नाही. लोक भष्ट्राचार करतील आणि वाळू माफिया आणि दारू माफिया तयार होतील.

Video : जेवणं जाईना पोटात, हातात मोबाईल फोन… : ‘सारेगमप’च्या मंचावर सलील-मृण्मयीचे अफलातून भारुड

राहुल गांधी आणि सोनिया गांधीना मी काम करतोय हे दाखवण्यासाठी अशा प्रकारची विधानं ते करत आहेत. भारत चंद्रावर पोहचला पंतप्रधान यांनी पाठबळ दिल्याने आज मोहीम यशस्वी झाली. शास्त्रज्ञांचं अभिनंदन करणे ही नैतिकता आहे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोत गेले. पण, विरोधी पक्षाचे नेत्यांना ते सहन होत नाही, कारण 65 वर्षात त्यांनी कधी अस केलंच नाही असा हल्लाबोलही त्यांनी केला.

काँग्रेस ढासाळलेल्या स्थितीत

यावेळी त्यांनी भाजपचा इतिहास गौरवशाली आहे, आम्हाला जन्मजात काही मिळालं नाही, काँग्रेस बरखास्त करा असे महात्मा गांधी म्हणाले होते, पण पिढ्यानपिढ्या ते त्याच पक्षाच्या नावावर निवडणूक लढवत आहेत. एकूणच काय तर, आज काँग्रेस ढासाळलेल्या अवस्थेत असून, भाजपला मिळणाऱ्या जनतेचा प्रतिसाद पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.  त्यामुळेच भीती पोटी ते असे विधान करत आहेत. यावेळी त्यांनी इंडिया टुडे सी व्होटर सर्व्हेवरही भाष्य केले. आम्ही सर्व्हेवर विश्वास ठेवत नाही. कारण आम्ही 18 तास जनतेत आहोत, त्यांच्या मनातला आम्हाला कळतं त्यामुळे घाबरून जाण्याची अजितबात गरज नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube