Download App

‘मविआतील दोन जणांनी ड्राफ्ट तयार केला अन् माझी…’ राजू शेट्टींच्या रडारवर नेमकं कोण?

मी उमेदवार म्हणून सगळ्यांना भेटावे असे त्यांना वाटत होते. मी सगळ्यांना भेटलोही मात्र, त्यांना जे करायचे होते तेच त्यांनी केले,

Raju Shetti on MVA : लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघाची चांगलीच चर्चा झाली होती. या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास माजी खासदार राजू शेट्टी इच्छुक होते. परंतु, ठाकरे गटाच्या अटीमुळे शेट्टींना शिवसेनेच्या तिकीटावर निवडणुकीत उतरला आलं नाही असं त्यांनीच स्पष्ट केलं होतं. त्यानंतर राजू शेट्टींनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. या निवडणुकीत शेवटच्या क्षणी ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केला त्यामुळे राजू शेट्टींचा पराभव (Raju Shetti) झाला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली असा आरोप शेट्टींनी केला.

राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या कारभारावर जोरदार टीका केली. निवडून आल्यानंतर काय काम करणार याचा ड्राफ्ट महाविकास आघाडीने तयार केला होता. खरंतर जयंत पाटील आणि बंटी पाटील यांनीच हा ड्राफ्ट तयार केला होता. पण पुढे ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार जाहीर केला. याआधी सहा महिन्यांपूर्वी मात्र ही जागा सोडू असे त्यांच्याकडून सांगितले जात होते. मी उमेदवार म्हणून सगळ्यांना भेटावे असे त्यांना वाटत होते. त्यानुसार मी सगळ्यांना भेटलोही मात्र, त्यांना जे करायचे होते तेच त्यांनी केले, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला.

सर्वांनी मिळून शेवटी माझा विश्वासघात…; राजू शेट्टींची मविआच्या नेत्यांवर हल्लाबोल

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे. या मार्गाची काहीच गरज नाही. गोवा, नांदेड आणि लातूर यांसारख्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते आहेत. महामार्ग आहेत. तेव्हा आता पुन्हा त्या दिशेने जाण्यासाठी नव्या महामार्गाची काहीच गरज नाही. सध्या आहे त्याच टोलनाक्यांना पैसे मिळत नाहीत. यावरून असे दिसते की प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांना या माध्यमातून पैसा गोळा करायचा आहे, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला.

दरम्यान, हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टी यांनी तयारी केली होती. त्यांना ठाकरे गटाकडून तिकीटही मिळणार होते. यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत चर्चाही केली होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत चाललेली चर्चा मात्र नंतर फिस्कटली. उद्धव ठाकरे यांनी मला मशाल चिन्हावर निवडणूक लढण्याची अट घातल्याचे नंतर राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले होते. त्यांची ही अट मान्य करणे शक्य नव्हते असे राजू शेट्टी म्हणाले होते. यानंतर महाविकास आघाडीने सत्यजित सरुडकर यांना मशाल चिन्हावर उमेदवारी देत आपली फसवणूक केली असा आरोप राजू शेट्टी यांनी केला.

Kolhapur : राजकीय हालचालींना वेग; भाजपची ताकद वाढणार? सतेज पाटलांबद्दल मोठा गौप्यस्फोट

follow us

वेब स्टोरीज