सर्वांनी मिळून शेवटी माझा विश्वासघात…; राजू शेट्टींची मविआच्या नेत्यांवर हल्लाबोल
Raju Shetty On Mahavikas Aghadi : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांना दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, या पराभवानंतर आता राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मविआच्या नेत्यांनी माझी फसवणूक केल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.
पहिल्याच अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार; लोकसभेचे उपाध्यक्षपद पदरात पाडून घेणार ?
राजू शेट्टी यांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, खरंतर पाठिंबा दिल्यानंतर नेमकं निवडणून आल्यानंतर काय भूमिका घेणार याचा आराखडा तयार करण्यात आला होता. तो ड्राफ्ट जयंत पाटील, बंटी पाटील यांनी तयार केला होता. मात्र, नंतर त्यांनी आपला उमेदवार जाहीर केला, असं शेट्टी म्हणाले.
शेट्टी पुढं म्हणाले की, निश्चितच विश्वासघात झाला. कारण, गेल्या सहा महिन्यांपासून ही जागा आम्हाला सोडली, असं ते सांगत होते. त्यांना वाटत होतं की, मी उमेदवार आहे. त्यामुळे उमेदवाराने महाविकास आघाडीतील पक्षाच्या नेत्यांना भेटलं पाहिजे. त्यानंतर मी उद्धव ठाकरे यांची दोनदा भेट घेतली. कोल्हापुरातील काँग्रेस नेते सतेज (बंटी) पाटील यांचीही भेट घेतली. शरद पवार यांच्याशी देखील फोनवर चर्चा केली होती. मात्र, या सर्वांनी मिळून शेवटी जे करायचं, तेच केलं, असा हल्लाबोल शेट्टी यांनी केला.
विधानसभेपूर्वी नगर शहरात राष्ट्रवादी अॅक्टिव्ह; विजेच्या समस्येवरून महावितरणला घेराव
यावेळी स्थानिक प्रश्नांवरही शेट्टी यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाची सध्या आवश्यकता नाही. गोवा, नांदेड, लातूर सर्वत्र जाण्यासाठी महामार्ग आहेत. आता पुन्हा त्याच दिशेला जाण्यासाठी नव्या महामार्गाची गरज नाही. आता त्याच टोलनाक्यांना अपेक्षित पैसे मिळत नाही, यावरून असं लक्षात येतं काही प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांना शक्तीपीठाच्या माध्यमातून अमाप पैसा जमवायचा आहे, जसा समृद्धी महामार्गातून मिळवला, असा टोला शेट्टी यांनी लगावला.
शेतकऱ्यांचा या मार्गाला विरोध आहे. बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हा मार्ग होऊ द्यायचा नाही, असा निर्धार केल्याचं शेट्टी म्हणाले.