पहिल्याच अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार; लोकसभेचे उपाध्यक्षपद पदरात पाडून घेणार ?

  • Written By: Published:
पहिल्याच अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार; लोकसभेचे उपाध्यक्षपद पदरात पाडून घेणार ?

Opposition India alliance to contest for loksabha Speaker, if denied Deputy Speaker : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली एनडीए (NDA) चे सरकार अस्तित्वात आले आहे. मंत्र्यांना खातेवाटप झाले असून, ते कामाला लागले आहेत. परंतु लोकसभेचे अध्यक्षपदावरून तिढा अद्याप संपलेला नाही. एनडीए आघाडीने भाजपने महत्त्वाचे खाते आपल्याकडेच ठेवले आहे. त्यामुळे तेलुगू देसम पार्टी (TDP) ला लोकसभेचे अध्यक्षपद हवे आहेत. परंतु अध्यक्षपदासारखे महत्त्वाचे पद भाजप आपल्याकडे ठेवणार आहे. तर आता इंडिया आघाडीने मोठे राजकारण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभेचे उपाध्यक्षपद न दिल्यास अध्यक्षपदासाठी उमेदवार इंडिया आघाडीकडून देण्यात येईल, अशी माहिती आता समोर येत आहे.

>पराभव माझा, पण नाचक्की भाजप अन् चव्हाणांची, प्रतापराव चिखलीकरांची नाराजी जाहीर

18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 24 जूनपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन तीन जुलैला संपणार आहे. नऊ दिवसांचे हे विशेष अधिवेशन असणार आहेत. या अधिवेशनातही लोकसभेच्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. याची प्रक्रिया 26 जून रोजी सुरू होणार आहे. इंडिया आघाडीने 233 जागा जिंकलेल्या आहेत. तर एनडीए आघाडी बहुमतात आहे. भाजपला उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेश या तीन राज्यात फटका बसला आहे.

शिखर बॅंक : क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतला? अण्णा हजारे म्हणतात, ‘मला कल्पनाच नाही…’

तब्बल दहा वर्षानंतर भाजपला बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे एनडीएमधील घटक पक्षाच्या जोरावर सरकार अस्तित्वात आलेले आहे. मंत्रिमंडळातील महत्त्वाचे खातेही घटक पक्षांना मिळालेले नाहीत. त्यामुळे एनडीएमधील अनेक पक्षांचा अध्यक्षपदावर डोळा आहे. परंतु अध्यक्षपदाबरोबर उपाध्यक्ष पदही महत्त्वाचे असून, त्याला घटकात्मक दर्जा आहे. तर अध्यक्षांच्या गैरहजरीत उपाध्यक्ष सभागृहाचे कामकाज पाहत असतात. त्यामुळे हे दोन्ही पदे महत्त्वाची आहे. त्यामुळे उपाध्यक्षपद मिळविण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न आहे. उपाध्यक्षपद न मिळाल्यास अध्यक्षपदासाठी उमेदवार दिले जाईल, असे आता इंडिया आघाडीच्या गोटातून सांगण्यात येत आहे.

कोणत्या मुद्द्यावरून विरोधक घेरणार?

इंडिया आघाडीकडून लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपद कोणाला द्यायचे यावर चर्चा सुरू आहे. इंडिया आघाडीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेसकडे 99 खासदारांचे संख्याबळ. त्यामुळे राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेते पद नियुक्ती करण्यासाठी इंडिया आघाडीचा प्रयत्न आहेत. शेअर बाजार घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेसने केलेला आहे. सध्या नीट परीक्षेचे प्रकरणही गाजत आहे. त्यामुळे दोन्ही मुद्द्यावर विरोधक हे सरकारला घेरण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube