Download App

Sanjay Raut : ‘वॅग्नर’सारखाच शिंदे गट भाडोत्री, एक दिवस भाजपलाच.. राऊतांचा हल्लाबोल!

Sanjay Raut criticized Eknath Shinde : रशियाचे हुकुमशाह व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या स्वार्थासाठी वॅग्नरचे सैन्य भाडोत्री ठेवले होते. पण, तेच सैन्य आज त्यांच्यावर उलटले आहे. आपल्या महाराष्ट्रातही भाडोत्री सैन्याचेच राज्य आहे. भाजपने (BJP) सत्तेसाठी भाडोत्री शिंदे गट पाळला असून कधी ना कधी हा गट त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही, असा दावा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

राऊत आज मंत्री शंभूराज देसाई यांचा मतदारसंघ असलेल्या पाटण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत राज्यातील शिंदे सरकारवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, भाजपने पुतीन यांच्या प्रमाणेच राज्यात भाडोत्री सैन्य ठेवले आहे. पण, हे भाडोत्री कुणाचेच नसतात. हे बाजार बुणगे आहेत. ते एक दिवस भाजपलाच खतम केल्याशिवाय राहणार नाहीत.

‘भाजप हा विषारी फणा तो ठेचणारच!; राऊतांनी सांगितलं महाविकास आघाडीतलं खरं गुपित

आधी पाच हजार कोटींचा हिशोब द्या

राऊत यांनी कोरोना काळात मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे गटावर टीका केली होती. त्यावर राऊत यांनी भाष्य केले. तुम्ही (एकनाथ शिंदे) कुणाचे पैसे खाऊन पन्नास पन्नास खोके दिले त्याचा आधी हिशोब द्या. साताऱ्यात दरे नावाचं गाव आहे तिथे तुम्ही शेती करता तिथून काय पैशांच्या नोटा येतात का, सरकार पाडण्यासाठी पाच हजार कोटी रुपये कुठून आले?, तिथूनच आले का? त्याचा आधा हिशोब दिलात तर मग बाकीचे हिशोब तुम्हाला लोकांना देता येतील.

पाहू या, कोण कुणाच्या घरात घुसतंय ते?

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात काल थेट परिवारावरून टीका टिप्पणी सुरू होती. फडणवीस यांनी केलेल्या टीकेचा राऊत यांनी तिखट शब्दांत समाचार घेतला. राऊत म्हणाले, पाहूया कोण कुणाच्या घरात घुसतंय ते. अशी महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती. घरापर्यंत घुसण्याची. ही जी विकृती आहे ती भारतीय जनता पक्षाने सुरू केली. हे गेल्या दहा ते चौदा वर्षांतलं पाप आहे.

याआधी हा महाराष्ट्र अत्यंत निर्मळ मनानं राजकारण करत होता. विरोधक पण काम करत होते सत्ताधारी देखील काम करत होते. निवडणुकीत जय पराजय होत होते. पण आज हा जो राजकारणाचा चिखल दिसतो आहे तो भाजपाच्या विकृतीतून आला आहे. घरापर्यंत घुसणं, शिवराळ भाषा वापरणं, व्यक्तिगत टीका करणं कुणी सुरू केलं पाहा ना.आठ नऊ वर्षांपूर्वीचं राजकारण पाहा आणि आताचं राजकारण पाहा. हा बदल कुणी केला? ही घाण कुणी केली? कचरा कुणी केला? शंभर टक्के भाजपनेच महाराष्ट्राची वाट लावली आहे, असा घणाघात राऊत यांनी केला.

Tags

follow us