‘भाजप हा विषारी फणा तो ठेचणारच!; राऊतांनी सांगितलं महाविकास आघाडीतलं खरं गुपित

‘भाजप हा विषारी फणा तो ठेचणारच!; राऊतांनी सांगितलं महाविकास आघाडीतलं खरं गुपित

Sanjay Raut criticized BJP : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत माहिती दिली. तसेच भाजपवर (BJP) घणाघाती टीका केली. कोणत्याही परिस्थितीत या महाराष्ट्रात भाजपला डोके वर काढू द्यायचे नाही. हा विषारी फणा आहे तो ठेचायचा. त्यावर महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांचे एकमत आहे, असे राऊत म्हणाले.

राऊत आज साताऱ्यात होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांची चर्चा सुरू आहे. आमचं एक धोरण आहे जो जिंकू शकेल खात्रीने त्याची जागा. कोणत्याही परिस्थितीत या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला डोके वर काढू द्यायचे नाही. हा जो विषारी फणा आहे तो ठेचायचा. त्यावर आमच्या महाविकास आघाडीच्या तीन्ही पक्षांचे एकमत आहे. राष्ट्रीय पातळीवर देखील काल पाटण्याच्या बैठकीत एकमत झाले आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. एखाद्या जागेवरून खेचाखेची होईल असे नाही कारण, काही त्याग करण्याची तयारी तीन्ही पक्षांनी ठेवली आहे.

BJP : आजचे निवडणूक प्रमुख हेच उद्याचे उमेदवार? बावनकुळेंनी इच्छुकांना दिला सूचक संदेश

बावनकुळे झोपेत आहेत 

बावनकुळे सध्या झोपेत आहेत. अजून त्यांनी नीट डोळे उघडलेले नाहीत. त्यांच्या चेहऱ्याकडे नीट पाहा जसे आताच झोपेतून उठल्याचे दिसतात. त्यामुळे अशा माणसाकडून तुम्ही काय अपेक्षा करता. त्यांना काय देश माहिती आहे. विधानसभेत तर त्यांना तिकीटही नाकारण्यात आलं. अनेक काळ ते वनवासातच होते. त्या धक्क्यातून ते सावरले आहेत की नाही माहिती नाही. 2019 मध्ये परिस्थिती वेगळी होती आता वेगळी आहे. देशातील किमान 450 मतदारसंघात आम्ही एकास एक उमेदवार देणार आहोत.

म्हणून औरंगजेबाचा होतोय वापर 

या महाराष्ट्राने औरंगजेबाला गाडल आहे. त्याच्या कबरेवरची माती किती वेळा उकरायची. पण भारतीय जनता पक्ष मतं मिळत नाहीत म्हटल्यावर औरंगजेबाच्या नावाचा वापर करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube