Sangli Lok Sabha Vishal Patil : सांगली मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. विशाल पाटील यांनी (Vishal Patil) काल मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर आयोजित जाहीर सभेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आता त्यांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत. मतविभाजनाच्या फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशाल पाटलांनी माघार घ्यावी यासाठी मविआच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यावर आता विशाल पाटील यांनीही गुगली टाकत नेते मंडळींची कोंडी केली आहे. मी अर्ज मागे घ्यायला तयार आहे पण माझी अट आहे. काँग्रेसने या मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार द्यावा, अशी अट विशााल पाटील यांनी ठेवली आहे.
तसं पाहिलं तर हा मतदारसंघ ठाकरे गटाला सुटला आहे. येथे त्यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारीही दिली आहे. अशा परिस्थितीत हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे येण्याची सूतराम शक्यता नाही. त्यामुळे पाटील यांची अट पूर्ण करणे काँग्रेस नेत्यांसाठी कठीण जाणार आहे. मात्र विशाल पाटलांनी काँग्रेस नेत्यांना चांगलेच कोंडीत पकडले आहे.
Sangli Loksabha : सांगलीची जागा ठाकरे गटाला कशी गेली? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
विशाल पाटील पुढे म्हणाले, जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या नेत्यांनी संपर्क केला होता. मशाल चिन्हावर लढण्याची ऑफरही दिली होती. मला पक्षानेही या चिन्हावर लढण्यास सांगितलं असतं तरी मी पक्षाच्या विचारधारेशी ठाम आहे, असं त्यांना सांगितलं असतं. माझ्या उमेदवारीला विरोध करून काँग्रेसची उमेदवारी घालवायची असेल तर मी थांबायला तयार आहे. पदासाठी मी माझ्या विचारधारेशी कोणत्याही प्रकारचा समझोता करणार नाही असे पाटील म्हणाले.
दरम्यान, कालच्या सभेत विशाल पाटील म्हणाले होते, की या सभेत विशाल पाटील म्हणाले, 1917 मध्ये वसंतदादाचा जन्म झाला आणि 1919 मध्ये वसंतदादांचे छत्र हरपलं. त्यानंतर त्यांना लोकांनी साथ दिली, पाहुण्यांनी आधार दिला. तरुणपणात दादांना काँग्रेस सापडली, काँग्रेसनं त्यांना घडवलं. यामुळे वसंतदादा घराण्याचं काँग्रेस पक्षावर प्रचंड प्रेम आहे.
कदम-पाटील आक्रमक पण, थोरात पटोलेंचा समजावणीचा सूर; चार वक्तव्यांत दिसला सांगलीचा ‘मूड’
मी 1999 पासून काँग्रेस पक्षाचा काम करतो. मी माझ्या वडिलांना खासदार म्हणून पाहिलं आहे. प्रत्येक घरातील पोराला आपल्या बापासारखं झालं पाहिजे, असं वाटतं. तसे मलाही वाटतं. वसंतदादांच्या घरात जन्माला आलो, ही माझी चूक झाली का? आजोबा आणि वडिलांसारखं झालो, तर ती माझी चूक आहे का? मी स्वार्थासाठी लढत नाही, असं म्हणताना विशाल पाटलांच्या डोळ्यात अश्रू आले.