विशाल पाटलांनी अर्ज भरला, ‘मविआ’ला फटका? ठाकरेंनी एकाच वाक्यात विषय संपवला

विशाल पाटलांनी अर्ज भरला, ‘मविआ’ला फटका? ठाकरेंनी एकाच वाक्यात विषय संपवला

Uddhav Thackeray on Sangli Lok Sabha : महाविकास सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही कायम आहे. आता तर विशाल पाटील (Vishal Patil) यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या भूमिकेनंतर काँग्रेसला तर धक्का बसला आहेच शिवाय ठाकरे गटाच्याही अडचणी वाढल्या आहेत. काँग्रेसची ही नवी स्ट्रॅटेजी पाहता ठाकरे दबावात येऊन चंद्रहार पाटील यांची उमेदवारी मागे घेतील अशीही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) आज पत्रकार परिषद सांगली कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले.

Uddhav Thackeray: ‘मी तसं पुत्रप्रेम दाखवलं नाही’ उद्धव ठाकरेंचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर

आगामी निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे गीत लाँच करण्यात आले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी पत्रकारांनी त्यांना सांगली मतदारसंघातील तिढ्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, सांगलीत महाविकास आघाडीला फटका बसेल असं काहीही होणार नाही. जागावाटप झालं. आघाडीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत अधिकृत जागावाटप जाहीर केलं आहे. आता जर कुठं बंडखोरी आणि वेगळं काही होत असेल तर ती जबाबदारी पक्ष नेतृत्वाची आहे. आणि जर असं घडलं तर जनता त्यांना स्थान देणार नाही.

महायुतीचे नेते राज्यात 45 पेक्षा जास्त जागा जिंकू असे सांगत आहेत. त्यांचा स्ट्राइक रेट 45 राहिल तुमचा किती असेल असा प्रश्न विचारला असता ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीचा राज्यात 48 चा स्ट्राइक रेट आहे. त्यांचा तर 45 चा स्ट्राइक रेट हा  सगळ्या देशात आहे. आमचा तर फक्त राज्यातला आहे असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांना लगावला.

Uddhav Thackeray : सांगलीसह सगळीकडे शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करा; ठाकरेंनी कॉंग्रेसला ठणकावलं

भाजपा व्हॅक्यूम क्लिनर झालाय कारण ते सगळे भ्रष्टाचारी गोळा करत आहे. मोदींचा व्हॅक्यूम क्लिनर सगळीकडे फिरतोय अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर केली.

शिवसेनेचे मशाल गीत लाँच 

दरम्यान, आज ठाकरे गटाकडून नवीन गीत लाँच करण्यात आले. मशाल या चिन्हात काही बदल करून नवीन चिन्हही प्रसिद्ध करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत गीत आणि पक्षचिन्ह लाँच केले. राज्याच्या कानाकोपऱ्यात मशाल चिन्ह पोहोचलं आहे. आता हे फक्त चिन्ह नाही तर सरकारविरोधात असणारा असंतोष या माध्यमातून बाहेर पडणार अशी टीका उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube