OBC Reservation : आजपर्यंत दलित समाजाला वेशीच्या बाहेर ठेवलं जात होतं. परंतु मराठा समाजाच्या (Maratha Reservation) जरांगेला मुंबईच्या वेशीच्या बाहेर मी ठेवलं आहे. आपली याचिका हायकोर्टाने मंजूर केली आणि जरांगेला सांगितलं की तु मुंबईमध्ये येऊ शकणार नाहीस. कारण तु खुनी आहेत. तुझा इतिहास गुन्हेगारीचा आहे. पंढरपूर येथे एका अपंग मुलाचा खून करून फाशी दिल्याचे दाखवले हा जरांगेचा इतिहास आहे, असा आरोप करत ओबीसी नेते शंकर लिंगे यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना अटक करण्याची मागणी केली.
अहमदनगरमधील ओबीसी एल्गार मेळाव्यात शंकर लिंगे यांनी गंभीर आरोप केला आहे. मनोज जरांगे खुनी आहे, त्यांच्यावर 302 अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दुसरी याचिका उद्या पडणार आहे. 2004 च्या जीआरमध्ये मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा हे एक आहेत असा उल्लेख आहे पण हे कुणबी नाहीत. हा जीआर आम्ही चॅलेंज केला आहे, असे शिंगे यांनी सांगितले.
Chhagan Bhujbal : अंबड रॅलीच्या आदल्या दिवशीच राजीनामा दिला होता; भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
दरम्यान, नगर येथे झालेल्या ओबीसी मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, जिथे जिथे ओबीसी लोक राहतात तिथे त्यांना दहशत आणि मारहाण केली जात आहे. लोक गाव सोडून जात आहेत. फडणवीससाहेब, तुमच्या विभागात भेदभाव योग्य नाही. रात्री दोन ते तीन या वेळेत बैठक सुरू आहेत. गावोगावी ओबीसींचा छळ केला जातो, तक्रार घेतली जात नाही, अशी टीका भुजबळांनी केली.
मराठ्यांना गुलाल उधळायची संधीच देणार नाही, ओबीसींचाच मुख्यमंत्री करू; शेंडगेंचा इशारा
भुजबळांच्या मागे सर्वांनी उभे राहा. भुजबळ हे एकटे नाहीत, आम्ही सगळे आहोत. ओबीसींचा अधिकार घेतात तुम्हाला तुमची जागा दाखवली जाणार नाही, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.