अहमदनगर : काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजित तांबे यांची भाजपच्या नेत्यांसोबत बैठक घडवून आणण्यासाठी आमदार राम शिंदे यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांना टोला लागवला आहे.
सत्यजित तांबे आणि डॉ. सुधीर तांबे हे कोणताही निर्णय घेण्याला सक्षम आहेत. त्यांना कुठलीही बैठक करण्याची गरज नाही, असा टोला राम शिंदे यांना रोहित पवार यांनी लागवला.
नाशिक पदवीधर निवडणुकीवर सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर बोलताना रोहित पवार, काँग्रेसचा हा अंतर्गत वादा आहे. कोणाला उमेदवारी द्यायची किंवा नाही द्यायची यावर बसून चर्चेतून विषय संपला पाहिजे होता.
पण तो संपला नाही. यावरुन कन्फ्युज वाढत आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्रित बसून याला एका निर्णायक लेवलला नेण्याची गरज आहे. सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी यामध्ये लक्ष घालून काँग्रेसला थोडंसं सांगून काही मार्ग निघतोय का हे पाहायला पाहिजे, असा सल्ला रोहित पवार यांनी दिला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळातील योजनांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन हे त्यांच्या प्रतिमेला डाग लावण्याचा प्रकार आहे, असे संजय राऊत म्हणाले होते.
यावर रोहित पवार म्हणाले, बोईंग आणि एअरबसचे, रिपेरिंगचे कारखाने नागपूरला आणावेत, तसेच कर्जत-जामखेड मध्येही बाराशे एकर जमीन एमआयडीसीसाठी मंजूर झालेली आहे. त्यातील एखादा प्रकल्प कर्जत-जामखेड येथे आला तरी काही हरकत नाही.