Download App

Rajan Patil यांनी यंदाही आपला गड राखला; मोहोळ बाजार समिती बिनविरोध

  • Written By: Last Updated:

राज्यभरात बाजार समिती निवडणुकीच्या चर्चा होत असताना मोहोळ बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यात माजी आमदार राजन पाटील यांना यश आले आहे. त्यामुळे तब्बल ७५ वर्ष एकहाती वरचष्मा असलेल्या मोहोळ (Mohol) बाजार समितीवर राजन पाटील (Rajan Patil) यांनी आपला दबदबा दाखवून दिला आहे. मोहोळ बाजार समितीची स्थापना १९५४ साली झाली तेव्हापासून आजवर राजन पाटील यांच्या परिवाराचेच बाजार समितीवर वर्चस्व आहे.

काल सोमवार दि. ३ एप्रिल हा मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीचा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.  शेवटच्या दिवशी १८ जागेसाठी अखेरच्या दिवशीपर्यंत फक्त १८ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे मोहोळ कृषी बाजार समितीवर १८ संचालक बिनविरोध निवडून जाणार आहेत.

Devendra Fadnvis : अरे…हरामखोरांनो! सावरकरांनी इतर कैद्यांसाठी माफीचा अर्ज केला होता…

यावर्षी पहिल्यांदाच बाजार समिती निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांमधून उमेदवारांना निवडणूक लढविण्याची संधी होती. मात्र असे असताना केवळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी बरोबर १८ अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे सांगितले जात आहे. पण या निवडणुकीच्या निमित्ताने माजी आमदार राजन पाटील यांचे मोहोळ तालुक्यातील आपले वर्चस्व निर्विवाद असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

मोहोळ बाजार समितीतील उमेदवारी अर्ज

सोसायटी मतदारसंघ
प्रशांत भागवत बचुटे (वरकुटे), नागराज आप्पासाहेब पाटील (शेजबाभूळगाव), गोविंद अंबरशी पाटील (डिकसळ), संतोष पांडुरंग सावंत (पिरटाकळी), माणिक नेमिनाथ सुरवसे (वडदेगाव), धनाजी सुरेश गावडे( सावळेश्वर), सचिन जनार्दन बाबर (खंडाळी),

सोसायटी महिला राखीव
स्मिता दत्तात्रय काकडे (पोखरापूर) दीपाली सज्जन चवरे (पेनूर)

सोसायटी ओबीसी मतदारसंघ
विकास बाबासाहेब कुंभार(मोरवंची)

सावंतांची राणा पाटलांवर कुरघोडी : Eknath Shinde यांनी दिला भाजपबरोबर ‘मविआ’ला धक्का!

भटके विमुक्त जाती-जमाती
शाहीर गणपत सलगर (सारोळे)

ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदार संघ
पोपट केशव जाधव (येणकी), बाळकृष्ण आप्पासाहेब साठे (भोयरे), नवनाथ माणिक वराडे (इंचगाव)

ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती
बाळासाहेब पांडुरंग गायकवाड (जामगाव बुद्रूक)

व्यापारी मतदारसंघ
महेश शरद आंडगे(मोहोळ), राजशेखर सुरेश घोंगडे (मोहोळ)

हमाल तोलार मतदार संघ
भीमराव विठोबा राऊत(अनगर)

follow us