पंढरपूर तालुक्यातील महिलेची बॉडी कालव्यात (Solapur) आढळून आल्याने खळबळ उडाली होती. इन्स्टाग्राम सोशल मीडियावरील रील स्टार असणाऱ्या ३४ वर्षीय सोनाली जाधव हिचा खून झाला होता. अनैतिक संबंधातून प्रियकरानेच तिचा जीव घेतल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे ऐन वाढदिवशीच तिचा मृत्यू झाल्याचं समोर आल्याने हळहळ व्यक्त केली जात होती.
सोनाली जाधव सोशल मीडियावर रील व्हिडीओ तयार करुन फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध झाली होती. तिचा विवाह झाला होता, परंतु काही कौटुंबिक कारणामुळे ती आपल्या पतीपासून वेगळी होऊन माहेरी राहत होती. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसे गावातील सोनाली जाधव हिची अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचे उघड झाले आहे.
मोदी सरकारने महिला आरक्षणाबाबची अधिसूचना मध्यरात्री का काढली? समजून घ्या सोप्या भाषेत
सोनाली जाधव हिचा विवाह झाला होता, मात्र ती सध्या तिच्या माहेरी भोसे येथे राहत होती. भोसे येथे राहत असताना गावातील तुकाराम उर्फ बुवा वामन गावांधरे नामक तरुणाशी तिचे प्रेम संबंध जुळून आले होते. सुरुवातीला झालेली ओळख काही दिवसातच मैत्रीत बदलली. या मैत्रीचे रुपांतर प्रेमसंबंधात व्हायला वेळ लागला नाही. मात्र या प्रेमसंबंधातून अल्पावधीतच वादही उद्भवले. प्रियकर तुकारामला सोनालीच्या चारित्र्याचा वारंवार संशय येत होता. तिचे अन्य एका व्यक्तीसोबत बोलणं किंवा फिरणं सुरु असल्याचं त्याला सतत वाटत असे. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार खटकेही उडत असत.
वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून सोन्याचे दागिने देतो, असं आमिष दाखवून तुकारामने सोनालीला बोलावलं. तिला आपल्या बाईकवर बसवून सोबत नेलं. निर्जन ठिकाणी गेल्यानंतर झालेल्या वादातून तुकारामने सोनालीचा गळा दाबल्याचा आरोप आहे. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सोनालीला त्याने रोपळे परिसरातील उजनी कालव्यात फेकून दिल्याची माहिती आहे.
दोन दिवस उलटूनही सोनाली घरी न आल्यामुळे तिच्या वडिलांनी करकंब पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तुकारामला ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. कालव्यातून कुजलेल्या अवस्थेतील बॉडी बाहेर काढल्यानंतर नातेवाईकांनी कपडे आणि अंगावरील दागिन्यांवरून ओळख पटवत ती बॉडी सोनालीचीच असल्याचं निष्पन्न झालं. रीलस्टारच्या मृत्यूमुळे सोनाली जाधवचे चाहतेही हळहळ व्यक्त करत आहेत.
