Download App

खुनी दरोडा घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून जेरबंद

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला परिसरात कल्याण गायकवाड यांच्या घरी १४ मार्चला सशस्त्र दरोडा पडला होता. या दरोड्यात कल्याण गायकवाड यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथून चार आरोपींना जेरबंद केले. यात निमकर अर्जुन काळे (वय २१, रा. रांजणगाव मशिद, ता. पारनेर), शेखर उदास भोसले (वय २०, रा. कोळगाव, ता. श्रीगोंदा), अतुल उदास भोसले (वय १९, रा. कोळगाव, ता. श्रीगोंदा) यासह एक अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, अरणगाव दुमाला येथील दरोड्यातील आरोपी तळेगाव दाभाडे येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तळेगाव दाभाडे येथील जुना टोलनाका परिसरात सापळा रचला. त्यावेळी सात संशयीत आरोपी पोलिसांना आढळून आले.

आधी लुटा मग शिक्षेविनाच सुटका, चोक्सीवरून राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

पोलिसांचा संशय येताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यातील चार आरोपींना पथकाने ताब्यात घेतले. यात टोळीचा प्रमुख निमकर काळे याचा समावेश आहे. तीन आरोपी पसार झाले.  या टोळीने रायगव्हाण (ता. श्रीगोंदे) व वडनेर हवेली, राळेगण थेरपाळ (ता. पारनेर) अशा तीन ठिकाणी दरोडा घातल्याचे तपासात समोर आले.

डोनाल्ड ट्रम्प यांना होऊ शकते अटक… जाणून घ्या नेमकं प्रकरण काय

ताब्यात घेतलेले आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. टोळीतील निमकर काळेवर १२, अतुल भोसले पाच तर शेखर भोसलेवर एक गुन्हा दाखल आहे. चारही आरोपींना बेलवेडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Tags

follow us