Download App

जीवाभावाचे सहकारी पुन्हा एकत्र ! शरद पवार थेट विजयसिंह मोहितेंच्या घरी

  • Written By: Last Updated:

सोलापूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते. दोन कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले शरद पवार हे काही आपल्या जुन्या सहकाऱ्यांना भेटले आहेत. काहींच्या घरीही पवार गेले. त्यात चर्चेत आली ती भेट म्हणजे अकलूज येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील (Vjiaysinha Mohite) यांची. शरद पवार काही वेळ मोहिते पाटील यांच्या अकलूज येथील निवासस्थानी होते. (Ncp leader Sharad Pawar meet ex dcm Vjiaysinha Mohite-patil)

दोघांच्या भेटीमध्ये एकमेंकाची वैयक्तिक विचारपूस करण्यात आली. या भेटीमागे कुठलीही राजकीय अर्थ नाही. केवळ एकमेंकाचे जुने सहकारी असल्यामुळे दोघे भेटल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी विजयसिंह मोहिते पाटील यांचा मुलगा आमदार रणजितसिंह मोहितेही उपस्थित होते. विजयसिंह मोहिते पाटील हे शरद पवारांचे जुने सहकारी आहेत. राजकीय परिस्थितीमध्ये मोहिते पाटील हे शरद पवारांची साथ सोडून भाजपमध्ये गेले होते. त्या काळात एकमेंकावर टीका-टिप्पणी झाली होती. त्यामुळे दोघांमध्ये राजकीय वितृष्ट आल्याचे बोलले जात होते.

Sharad Pawar : अजित माझा पुतण्या, भेटण्यात गैर काय? गुप्त भेटीवर शरद पवारांचा सवाल

पण सात महिन्यांपूर्वी बारामती येथे एक कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कृषी प्रदर्शनाला विजयसिंह मोहिते पाटील यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी शरद पवार व विजयसिंह मोहिते पाटील यांनी एकत्रितपणे कृषी प्रदर्शनाची पाहणी केली होती. या दोघांमध्ये मनोमिलन झाले असल्याचे बोलले जात होते. शरद पवारांची साथ सोडणारे विजयसिंह मोहिते पाटील हे पहिल्यांदा पवारांना भेटण्यासाठी गेले होते.

‘सांगोलाकरांना वाट बदलायची सवय नाही’, शरद पवारांच्या विधानाने शाहाजीबापूंना धडकी

त्यामुळे सोलापूर दौऱ्यावर गेलेले शरद पवार हेही थेट विजयसिंह मोहिते यांच्या निवासस्थानी गेले आहेत. अजित पवारांच्या बंडामुळे शरद पवारांना धक्का बसला आहे. त्यामुळे पक्ष उभारणीसाठी पवार हे जुने सहकारी बरोबर घेण्यासाठी चाचपणी करत आहे. त्यामुळे या भेटीला राजकीय अर्थ असल्याचे बोलले जात आहे.

Tags

follow us