‘सांगोलाकरांना वाट बदलायची सवय नाही’, शरद पवारांच्या विधानाने शाहाजीबापूंना धडकी
Sharad Pawar on Shahaji Bapu Patil : स्वातंत्र्याच्या लढ्यात काँग्रेस पक्षाचे महत्वाचे योगदान होते. पण 1948, 49 आणि 50 मध्ये काँग्रेस पक्षात मतभेद झाले. काँग्रेसची भूमिका शेतकरी आणि कष्टकरी यांच्या हिताची नाही अशी भूमिका काही लोकांनी मांडली. या लोकांनी एकत्र बसून भूमिका घेतली की काँग्रेसच्या चकोरी बाहेर जाऊन शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हिताची जपवणूक करणारी एक विचारधारा उभा केली पाहिजे. यासाठी नाशिक जिल्ह्यातील दत्ता देशमुख आणि काही सहकाऱ्यांनी प्रबंध लिहिला. यातूनच शेतकरी कामगार पक्षाचा जन्म झाला. सोलापूर जिल्ह्यातील शेकापच्या चळवळीतून गणपतराव देशमुख यांचे नेतृत्व तयार झाले, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितले.
ते पुढं म्हणाले की माझ्या घरात मी त्या पक्षाच्या विचाराचा नव्हतो. पण माझं संपूर्ण घर शेकापच्या विचाराचं होतं. त्यामुळे गणपतराव देशमुख आणि त्यांचे सहकारी आमच्या घरी जाण येण होत. राज्यातील कोणत्याही प्रश्नांवर हे लोक लाल झेंडा घेऊन आंदोलन करायचे. त्यामुळे हे सर्व मी लहानपणापासून घरात बघितलं आहे. या सर्व लोकांमध्ये गणपतराव यांचे नाव आघाडीवर होतं, असे शरद पवार यांनी सांगितले.
नवाब मलिक यांना जामीन; मात्र कोणत्याच यंत्रणांनी विरोध न केल्याने पृथ्वीराज चव्हाण यांना वेगळाच संशय
गणपतराव 1962 ला महाराष्ट्राच्या विधानसभेत आले आणि 1967 ला आलो. तेव्हापासून मी विधानसभा, लोकसभा किंवा राज्यसभा असं कोणत्या ना कोणत्या सभागृहात आहे. दुर्दैवाने गणपतरावांना दोन वेळा पराभव स्विकारावा लागला. हे दोन अपवाद वगळता सांगोल्याच्या जनतेने सातत्याने गणपतरावांना संधी दिली, असे शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार-अजितदादांच्या भेटीवर फडणवीसांचे कानावर हात; म्हणाले, मला जर..
देवेंद्र फडणवीसांना मी सांगू इच्छितो की हा मतदार संघ वेगळा आहे. हा एकच मतदारसंघ आहे की एकदा काँग्रेस आणि नंतर शेकाप यांनी नेतृत्व केलं. हे दोन पक्ष सोडले तर इतर कोणत्याही पक्षाला सांगोलाकरांनी स्विकारले नाही. एकदा एका रस्ताने जायचं ठरवल्यानंतर वाट कधी बदलायची सवय सांगोलाकरांना नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.